निसर्ग गाणे
जरा उन्हं वगैरे विसरून सकाळी सकाळी झाडा कडे पहिले की तजेलदार हिरवी पाने दिसतात .काही आंब्याच्या झाडांवर कोवळ्या हिरव्यागार कैऱ्या दिसतात .काही वेडे आळशी आंबे कैऱ्या अंगावर वागवण्या ऐवजी पुन्हा तांबूस पालवीने डवरून जाहीर करतात आता आम्हाला वेगळे वागायचेय. पिंपळ तर उत्साहाने नुसता सळसळत असतो , कित्ती वेगवेगळे पक्षी त्याच्या फांद्यांवर बागडत असतात. त्याला कुऱ्हाडी ची किंवा दगड खाण्याची भीती नाहीच. कारण बेदरकारपणे सगळ्या झाडांवर कुर्हाड चालवणारा माणूस पिंपळावर अंध श्रद्धे पोटी तरी कुर्हाड चालवत नाही. कसा चौ अंगानी पसरत चाललाय तो! आसुपालव आपली नवी पाने कावळ्यांची घरटी लपवायला वापरतोय आणि जरा डोकावून पाहायला सुरवात केली की कावळे कर्कश्श कावकाव करून आपल्या जातभाई ना गोळा करतात आणि जरा जरी आपल्याकडून धोक्याची शंका आली तर सतत लक्ष ठेवून टोच मारून आपले बाहेर डोकावणे हे बंद करू शकतात. मोगरीच्या झाडालाही नवी पालवी येवून झाड कळ्यानी भरून गेले आहे. जरा पाण्याचा ताण पडताच झाडे मलूल होत आहेत. गार वार्यात सकाळी संध्याक...