Posts

Showing posts from June, 2021

वेदना

 मैतरणीचे स्वप्न गोजिरे मनापासून  जोजवले ,  कसे  कुठे  अन् काय  बिनसले  ,गेले  गेले  निसटले. अस्वस्थ  मनाचे मुकेच रूदन कुणास कैसे   ऐकवले. अरण्यरूदन केवळ  ठरेल हे मनोमनी तरी  जाणवले.  विनाशब्द हे आसू ओघळती हृदय अंतरी दुखावले.  क्षमा  प्रीतीचा बोध आठवून मनास पुन्हा  कवळीले नव्या  दमाने उत्साहाने नवनवे गाणे  हे गुंफत गेले. दुःखास दडवून हृदयांतरी मी मुखवटे सुखाचे पेहेरले. संध्या  पाटील

मराठी अक्षरे ङ आणि ञ

 DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.) #ङ_ञ_व_त्र मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की? मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  : क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग) च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग) ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो,

ड्राइविंग

 काल पहिल्यांदा  मुंबई ते नाशिक गाडी चालवली. Feeling happy. खूप मस्त  वाटले. घाटात ट्राफिक जाम  होता. नेमका  काल एक ट्रक  पलटी झाला  होता.  पण लवकरच पोलिसांनी  मार्ग  मोकळा  केला.  नंतर  आम्ही  आणि  आमची इनोव्हा ! तीन तासात  मुंबई  ते नाशिक. ..... Love you INNOVA..