Posts

Showing posts from 2022

गणपती बाप्पा मोरया

 कोणी  दूरदेशी  निघाले  कि  आपण जोरजोराने  हात  हलवून  निरोप  देतो पुढच्या  प्रवासा साठी   शुभेच्छा  देतो आणि एका बाजूला  हळूच  मान वळवून  डोळे  टिपतो.  घर रीकामे ओकेबोके  वाटते. अगदी  अश्याच  भावना  गणेश  विसर्जनाला  दाटतात. एकीकडे  बाप्पा  ची निरोपाची  तयारी  उत्तर  पूजा ,  शिदोरी, आरतीची  तयारी  ,  निर्माल्य  गोळा करून ते ही आठवणीने  घेणे  आणि  दुसरीकडे  मनात खोल पडत जाणारा खड्डा  आणि इतरांना  जाणवू नये  म्हणून ओढलेला  उत्साहाचा  मुखवटा!  अगदी  आरती  म्हणताना  मध्येच  सूर खालावतो. बाप्पाची मूर्ती  डोळे भरून  पाहून  मनात  साठवून  ठेवली जाते. भरले डोळे  लपवत बाप्पा ला निरोप दिला  जातो. . . . .  निरोप घेतला  जातो  , पुढच्या वर्षी लवकर या  अश्या  गजराने! !! गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्षी लवकर या!