Posts

एक उलट एक सुलट

शहाद्याच्या 45° च्या काहिलीतून बाहेर पडलो  आणि  39°च्या  मुंबई  कुकरमध्ये शिजून  निघालो.  पुन्हा 5 दिवस नेपाळ मध्ये  धम्माल  केली.  मग  एक दिवस  मुंबई  नाशिक  मुंबईचा  ट्राफिक  चा घनचक्कर अनुभव घेतला.  शिवाय मुंबई  कुकर ते मुंबई  कुकर  व्हाया नाशिकच्या  प्रसन्न हवेचा  अनुभव घेतला. मग तश्याच  उकाड्यात  युद्धपातळीवर नेपाळच्या  बॅगा  रिकाम्या  करून  कपडे आणि घर आवरून  अमेरिकेच्या बॅगा  भरल्या.  त्यात  नेहमी प्रमाणे  वजन हा प्रश्न  ऐरणीवर होताच. शिवाय  सोसायटीचे कामही चालू होतेच. लष्कराच्या भाकर्‍या  भाजणे काही  संपत  नव्हते. या धबडग्यात आमचे व्याही आणि  विहीण  बाईच आमचे डावे उजवे हात  झाले. अखेर  आम्हाला  विमान तळावर सोडून  तेही त्यांच्या  गृही मार्गस्थ  झाले. 22 तासात  दोन  वेळा  विमान बदलून  एकदाचे अमेरिकेला पोहोचलो.
विमान  तळावर प्रश्नावलीला सामोरे  जात एकदाचे विमानतळा बाहेर पडलो  आणि पहिल्यांदा  स्वच्छ  हवेत एक दिर्घ  श्वास  घेतला.
आहा! एखाद्या   जायंट व्हील वर गरागरा  फिरून थांबलो की  थोड्या वेळाने  होते तशी आता  मनस्थिती आहे.
ही गोष्ट आहे २०१६ची!

       आता २०१९ च् जून मध्ये नेमकी…

आज खरोखर कसली गरज आहे?

लोकसत्ता चतुरंग मध्ये नीरजा चा एक लेख आला आहे "डीस्कनेक्ट होण्याच्या काळात"!
या लेखाची लिंक आमच्या शाळेच्या वॉटस अप गृपवर आमचा सोबती आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय कुमावत याने पाठवली होती.डाॅ. संजय हा लेख वाचून मनात उमटले ते मांडायचा प्रयत्न करते आहे. गेले काही दिवस जे वादळ मनात घोंगावत आहे त्याला मार्ग सापडतो आहे.

आपण शाळासोबती आहोतच पण या लेखात उल्लेख केला त्या प्रमाणे खरोखरच वाॅटस अप वरून कळत नकळत इतिहासातील सोयीचे अर्थ फाॅरवर्ड होत आहेत. राजकारणाचा प्रभाव वैयक्तिक नात्यात ताण निर्माण करतो आहे. सहिष्णुता किंवा सहनशीलता  हा आपला जो स्थायीभाव होता आणि आहे त्यावर काळोखी साचत चालली आहे. घराघरात राजकीय वैचारिक मतभेदांमुळे कटुता वाढते आहे. अगदी भावाभावात किंवा भाऊबहिणींमध्ये सुद्धा ताण वाढतो आहे. एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे पण नेमका त्यावरच घाव घालून मीच कसा /कशी बरोबर हा दृष्टिकोन वाढतो आहे.
आज जागरुकतेची खरोखर गरज आहे आणि त्यासाठी काळजातून येणारे पुस्तकातील किंवा कोणत्याही माध्यमातील शब्दच उपयोगी ठरतील पण ज्यांच्या काळजात माणूसजातीचा कळवळा आहे असे प्रभावी ल…

Healthy tips

40 Tips for a Better Life:

1. Take a 10-30 minute walk every day. And while you walk,
smile. It is the ultimate anti-depressant.

2. Sit in silence for at least 10 minutes each day.

3. Go to bed earlier and get more sleep.

4. When you wake up in the morning complete the following:
'Today, my primary purpose is to __________.'

5. Live with the 3 E's -- Energy, Enthusiasm, and Empathy.

6. Play more games and read more books than you did
last year.

7. Make time to practice meditation, and prayer.
They provide us with daily fuel for our busy lives.

8. Spend time with people over the age of 70 and under
the age of 6.

9. Dream more while you are awake.

10. Eat more foods that grow on trees and plants and eat
less food that is manufactured or packaged in factories.

11. Drink green tea and plenty of water.

12. Try to make at least three people smile each day.

13. Clear clutter from your house, your car, your desk and
let new energy flow into your life.

14. Don't waste your ene…
काय असते बरे आपल्या मनात ?

 काही सांगावे वाटते पुन्हा थांबावे वाटते. .........

एकेक विचार पिसून पुन्हा बोलावे वाटते>>>

जुने हरवलेले आठवावे वाटते पण आहे का महत्वाचे म्हणून परत मागे ठेवावे वाटते.!!!!!!!!!!!!!!!!!!!

 कोणी दुखावेल म्हणून गप्पच  राहावे वाटते-------

 शेवटी सारे उशीला चिब भिजवत सांगावे वाटते.

सारे तिलाच कळले सारेच तिला कळते....   

sandhya patil

आला वसंत आला

सकाळी  पाच  साडे पाचला उठावे .आवरून पावणेसहाला बाहेर पडावे. देवळालीत बर्याच  बागा आहेत. एखाद्या  बागेत जावे. सहा ते पावणेसात दणकून चालावे. नवरा व्यायाम करायच्या  साधनांकडे वळला की आपण पण थोडेफार कंबर , गुडघे वगैरेचा थोडा जादाचा व्यायाम  करावा. नंतर  एखादा बाक पकडावा.   मान नीट  बाकाच्या पाठीवर टेकेल अशी पोझ  घ्यावी आणि आकाशाच्या दिशेने  पहावे. मस्त  फिकट  निळ्या  रंगाच्या  पार्श्वभूमीवर हिरव्यागार  पानांनी लगडलेल्या  झाडाच्या  फांद्या , वरून घाईघाईने  उडत जाणारे पक्षी,  झाडांमधून ऐकू येणारी  पक्ष्यांची किलबिल, मधूनच ऐकू येणारी कोकीळेची सुरेल तान यामुळे  मन प्रसन्न  होत जाते. बदामाची काळपट बदाम ल्यालेली नखरेल फांदी , आकाशाचे छोटे छोटे तुकडे दाखवणारी वडाची भरगच्च जाळी, मोहोर न येता केवळ  वसंताची नवी  पालवी फुटलेला आंबा लक्ष वेधून घेत  असतात. मॅडचॅपसारखी जास्वंदी, तगर भरभरून  फुलतात. हे का फुलले म्हणून मोगर्याच्या कळ्या  डोकावतात आणि फुलून सगळ्या  बागेला सुगंधाचे अस्तर लावतात.
 हवेतला प्रसन्न  गोडवा अंगभर आणि मनभर लेवून आलो कि दोनचार तास तरी आनंदाने  जातात.  दिवस सुगंधित होऊन जातो.

निसर्ग गाणे

जरा उन्हं वगैरे विसरून सकाळी सकाळी झाडा कडे पहिले की तजेलदार हिरवी पाने दिसतात .काही आंब्याच्या झाडांवर कोवळ्या हिरव्यागार कैऱ्या दिसतात .काही वेडे आळशी आंबे कैऱ्या अंगावर वागवण्या ऐवजी पुन्हा तांबूस पालवीने डवरून जाहीर करतात आता आम्हाला वेगळे वागायचेय.

       पिंपळ तर उत्साहाने नुसता सळसळत असतो , कित्ती वेगवेगळे पक्षी त्याच्या फांद्यांवर बागडत असतात. त्याला कुऱ्हाडी ची किंवा दगड खाण्याची भीती नाहीच. कारण बेदरकारपणे सगळ्या झाडांवर कुर्हाड चालवणारा माणूस पिंपळावर अंध श्रद्धे पोटी तरी कुर्हाड चालवत नाही. कसा चौ अंगानी पसरत चाललाय तो!

    आसुपालव आपली नवी पाने कावळ्यांची  घरटी लपवायला वापरतोय आणि जरा डोकावून पाहायला सुरवात केली की कावळे कर्कश्श कावकाव करून आपल्या जातभाई ना गोळा करतात आणि जरा जरी आपल्याकडून धोक्याची शंका आली तर सतत लक्ष ठेवून टोच मारून आपले बाहेर डोकावणे हे बंद करू शकतात.

       मोगरीच्या झाडालाही नवी पालवी येवून झाड कळ्यानी  भरून गेले आहे. जरा पाण्याचा ताण पडताच झाडे मलूल होत आहेत. गार वार्यात सकाळी संध्याकाळी पाने डोलताहेत.

किती छान न! जरा थांबा अन् पहा याच्याकडे !!!

ययाती बद्दल!!

काही दिवसांपूर्वी 'ययाती ' हे श्री .वि.स. खांडेकर यांचे पुस्तक पुन्हा वाचले. शाळकरी वयात वाचले होतेच पण तेंव्हा फक्त मजा म्हणून किंवा अरे इतके गाजलेले आहे तर वाचू या म्हणून वाचलेले होते. यावेळी अगदी प्रस्तावनेसहित वाचले. ते दोन शब्द १९६१ सालातले आणि पुस्तक हाता वेगळे  केले ते ह्या पुस्तकाचा जन्म का आणि कसं झाला ह्याबद्दलची पार्श्वभूमी वाचून !
हा ययाती सर्वांच्याच मनात असतो त्याचा उपयोग करून  जाहिरात बाजी करून शारीरिक सौंदर्याचा बोलबाला केला जातो ते जपण्यासाठी करोडो रुपयाच्या बाजारपेठेला जन्म दिला जातो . उपभोगाची ज्वाला भडकतच राहावी संयमाचे आवरण त्यावर राहू नये यासाठीच जणू ह्या पासष्टाव्या कलेचा उपयोग केला जातो पण मनातल्या ययातीला  रोखायचे असते ते आपणच....
 त्या पार्श्वभूमी मध्ये लिहिलेला बारावा भाग माझ्या मनाला जास्त भिडला. त्याकाळात त्यांना जाणवलेले चित्रपटाचे दुष्परिणाम , सामाजिक बेफिकिरी ,काम आणि प्रेमात होत असलेली गल्लत सारे त्याना अस्वस्थ करीत होते ...
पण आजही ते आम्हा ला तसेच अस्वस्थ आणि हतबुद्ध करीत आहे ना......