वेदना

 मैतरणीचे स्वप्न गोजिरे मनापासून  जोजवले , 

कसे  कुठे  अन् काय  बिनसले  ,गेले  गेले  निसटले.

अस्वस्थ  मनाचे मुकेच रूदन कुणास कैसे   ऐकवले.

अरण्यरूदन केवळ  ठरेल हे मनोमनी तरी 

जाणवले. 

विनाशब्द हे आसू ओघळती हृदय अंतरी

दुखावले. 

क्षमा  प्रीतीचा बोध आठवून मनास पुन्हा 

कवळीले

नव्या  दमाने उत्साहाने नवनवे गाणे  हे गुंफत गेले.

दुःखास दडवून हृदयांतरी मी मुखवटे सुखाचे पेहेरले.


संध्या  पाटील

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस