Posts

Showing posts from 2021

वाचन वेड

 Shriniwas Deshpande   यांच्या या  कॉमेन्ट ने   काही जाणवले ते..........                                                                "नारदाने  वाल्या कोळ्याला पोँक करून विचारले, कोणासाठी असली अघोरी कामे करतोस बाबा ! का गुंतून राहतोस आपल्याच कामात ?  आपल्या फ्यामिलीसाठी का ? मुलाबाळांसाठी का ? मग जा अन त्यांना लगोलग पुसून ये,  विचारून ये,  या पापात शेअर घेणार का ?  त्याने लगोलग फ्यामिलीच्या वाॅलला टॅग टाकला  तर घरची सगळीच पाठ फिरवून बसलेली, बीजीचा बोर्ड लावून आपआपल्या  व्हाट्सअॅपवर  किंवा  फेसबुकवर गुंगून गेलेली.  आता हे वाचून झाली का पंचाईत ?  या स्क्रीनवरची नजर काढून आजूबाजूला बघणे आले ना !!!? गुड माॅर्निंग मित्रा "                                                                                                                                      हल्ली माझे  असे फेस बुक वर होत असे पण कागदी पुस्तक वाचून जे समाधान लाभते ह्या चेहरा पुस्तकात नाहीच!                                                                                       हसावे की रडावे? कशातही फार गुंतून जाणे वाईट

पाऊस

 पाउस पडून जुना झाला पण आज संधी मिळाली पावसात भिजायची आणि जाणवले कि हा जुना कधी होतच नाही. भिजले की  मनाला आनंदाचे नवे कोपल फुटतात. तप्त मनावर शीतल शिडकावा होतो.पुन्हा नव्याने उन्ह सोसायची तयारी होते आणि त्यातूनही नवे काही घडवावेसे वाटते.

वेदना

 मैतरणीचे स्वप्न गोजिरे मनापासून  जोजवले ,  कसे  कुठे  अन् काय  बिनसले  ,गेले  गेले  निसटले. अस्वस्थ  मनाचे मुकेच रूदन कुणास कैसे   ऐकवले. अरण्यरूदन केवळ  ठरेल हे मनोमनी तरी  जाणवले.  विनाशब्द हे आसू ओघळती हृदय अंतरी दुखावले.  क्षमा  प्रीतीचा बोध आठवून मनास पुन्हा  कवळीले नव्या  दमाने उत्साहाने नवनवे गाणे  हे गुंफत गेले. दुःखास दडवून हृदयांतरी मी मुखवटे सुखाचे पेहेरले. संध्या  पाटील

मराठी अक्षरे ङ आणि ञ

 DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.) #ङ_ञ_व_त्र मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की? मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  : क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग) च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग) ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो,

ड्राइविंग

 काल पहिल्यांदा  मुंबई ते नाशिक गाडी चालवली. Feeling happy. खूप मस्त  वाटले. घाटात ट्राफिक जाम  होता. नेमका  काल एक ट्रक  पलटी झाला  होता.  पण लवकरच पोलिसांनी  मार्ग  मोकळा  केला.  नंतर  आम्ही  आणि  आमची इनोव्हा ! तीन तासात  मुंबई  ते नाशिक. ..... Love you INNOVA..

सीतेचे दुःख (कविता)

 कधी  आपल्या  तेजाने   होरपळून  टाकणारी उन्हे तर कधी  आपल्या  वर्षावात  गुदमरून  टाकणारा  पाऊस  माये धरती  तुला  तरी कसे कळावे  या वर्षावाने सुखाचे निश्वास   मृदगंधातून कसे उसळावे आपली चिलीपिली , झाडे माडे  दुखावलेली पाहून मनीचे  आक्रंदन  कसे  रोखावे . हा पिढ्या नि पिढ्यांचा  भोगच ग माये तुझ्याकडून  तुझ्या  लेकीकडे  सीतेकडे अन् तिच्याकडून  गहू गहू सगळ्या  स्त्रियांकडे..... संध्या पाटील

देवभूमि

 किती वर्ष झाली ,  एकदा तरी  देवभूमीला केवळा  भेट देवू या  असे मनात   घोळत होते. आला एकदाचा तो योग ! एकट्याने  जाण्यापेक्षा  गृपने जाऊ ,  जास्त मजा येईल म्हणून दहा जण निघालोय.  जास्त  दगदग  नको म्हणून  जाणे येणे विमानाने! त्यात सहा जण आयुष्यात  पहिल्यांदाच  विमान प्रवास  करणारे होते.     काल सकाळी  आमच्याकडे  सगळे  जमले. सुचनेबरहुकूम त्यांनी  बॅगा  वजन आटोक्यात  ठेवून  भरल्या  होत्या. मग पर्समध्ये  चाकूच काय पण नेलकटर सुद्धा  नको  असे सांगून  मी त्यांना पॅकींगमध्ये बदल करायला  लावले. आमच्याकडे  प्रवासी कंपनीने  त्यांच्याही केबीन बॅगा  एकूण दहा पोचवल्या होत्या.  त्या दिल्या  आणि  काही   सामान त्यात  हलवले. हुश्श करत सगळे तैय्यार झाले बाबा!!     मस्त पैकी  घरची साजूक तूपातली पुरणपोळी,  आमरस त्यावर सढळ हस्ते  तुपाची धार , कटाची झणझणीत आमटी,  मिरचीभजी , पनीरपकोडा , असे साग्रसंगीत  मी रांधले होते. व्याही  विहीणी आणि  नणंदोई नणंद बाई जेवणार होते.  तेही एकदम सुगरण! 😀 पोटभर सुग्रास  जेवून निघालो.       गेटवरच्या पांडेभैयाच्या कृपेने पाच रीक्षा पोहोचल्या सोसायटीत !   मग त्यात सामान आणि माणसे भ

बाळ

 धरेला  चुंबतात कोवळ्या  अलवार  लाटा दधीच्या  जेव्हा  बाळा तुझ्या  कोमल  मुलायम  तळव्यांचा आठव येतो तेव्हा   दिनमणी पांघरतो भुईवर उबदार  लालस चादर उन्हाची जेव्हा  बाळा  तुझ्या  तान्हुल्या तेजाळ नखाग्रांची आठवण येते  मला  पोपटी  पानांच्या  टाळ्या  वाजवत रोपटे नभाकडे झेपावते  जेव्हा  माझा बाळकृष्ण  उभा  राहतांना त्यात दिसतो मला तेव्हा  राहशील  जगात  ठाम कणखर  दुर्बल  मदतीसाठी जेव्हा  हा माझा करुणाकर पुत्र  पहा अभिमानाने गर्जेन तेव्हा   ---संध्या  पाटील  11.1 2016 ह्या  वर्षातील  पहिली कविता  आलाप तुझ्या  साठी @ Abhishek Patil

टिटू

 दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सक्काळी टीटू चे सर आले .आम्ही सारे मुलांचे नवे ट्युशन चे सर घरी येतात तेंव्हा जसे उत्सुक असतो तसेच होतो.आता हे काय सांगतील? आपला सोन्या अभ्यास करेल का? त्याला ह्या सरांचे शिकवणे आवडेल का? मनात असंख्य प्रश्न होते. तर सर म्हणून ज्यांनी प्रवेश केला त्यानी टीटू चे  कौतुक केले. आमची छाती अभिमानाने फुगली ."आहेच आमचा सोन्या हुश्श्यार!!" त्यानी त्याला जवळ बोलावले तसे आमचे महाराज शेपूट फलकवत जवळ गेले.तसं टीटू जात्याच प्रेमळ ! नुसता दांडगा देह आणि प्रेमळ मन !         सरांनी आमच्या अभिमानाला पहिली टाचणी लावली. "किती महिन्यांचा हा?" म्हटले "तीन महिने!"सर म्हणाले ,"अरेरे !हा जरा जास्तच मोठा झालाय शिकवण्यासाठी!" उशिरा शाळेत मुलाला घालणाऱ्या पालकाच्या काळजीने आणि धाकधुकीने ,शरमेने मी विचारले ,"मग आता?" ते म्हणाले,"बघू ,शिकवू जमेल तेव्हडे!" "  पण सर साधारण कधीपासून शिकवायला सुरुवात करायला हवी होती?",मला माझी उत्सुकता गप्पा बसू देईना . अहो ताई ,पिल्लू एक महिन्याचे झाले की शिकवायला सुरुवात करावी लागते. नंत

नववर्षांच्या शुभेच्छा

नए साल  की शुभकामनाये देते हुए  हिंदी के जानेमाने कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना की कविता...   ----------------------------------------------------------------------------- नए साल की शुभकामनाएँ! खेतों की मेड़ों पर धूल भरे पाँव को कुहरे में लिपटे उस छोटे से गाँव को नए साल की शुभकामनाएं!  जाँते के गीतों को बैलों की चाल को करघे को कोल्हू को मछुओं के जाल को नए साल की शुभकामनाएँ! इस पकती रोटी को बच्चों के शोर को चौंके की गुनगुन को चूल्हे की भोर को नए साल की शुभकामनाएँ! वीराने जंगल को तारों को रात को ठंडी दो बंदूकों में घर की बात को नए साल की शुभकामनाएँ! इस चलती आँधी में हर बिखरे बाल को सिगरेट की लाशों पर फूलों से ख़याल को नए साल की शुभकामनाएँ! कोट के गुलाब और जूड़े के फूल को हर नन्ही याद को हर छोटी भूल को नए साल की शुभकामनाएँ! उनको जिनने चुन-चुनकर ग्रीटिंग कार्ड लिखे उनको जो अपने गमले में चुपचाप दिखे नए साल की शुभकामनाएँ! _---------------------------------------------------