सीतेचे दुःख (कविता)
कधी आपल्या तेजाने
होरपळून टाकणारी उन्हे
तर कधी आपल्या वर्षावात
गुदमरून टाकणारा पाऊस
माये धरती तुला तरी कसे कळावे
या वर्षावाने सुखाचे निश्वास
मृदगंधातून कसे उसळावे
आपली चिलीपिली , झाडे माडे
दुखावलेली पाहून मनीचे आक्रंदन
कसे रोखावे .
हा पिढ्या नि पिढ्यांचा भोगच ग माये
तुझ्याकडून तुझ्या लेकीकडे सीतेकडे
अन् तिच्याकडून गहू गहू सगळ्या स्त्रियांकडे.....
संध्या पाटील
Comments
Post a Comment