बाळ

 धरेला  चुंबतात कोवळ्या  अलवार  लाटा दधीच्या  जेव्हा 

बाळा तुझ्या  कोमल  मुलायम  तळव्यांचा आठव येतो तेव्हा  


दिनमणी पांघरतो भुईवर उबदार  लालस चादर उन्हाची जेव्हा 

बाळा  तुझ्या  तान्हुल्या तेजाळ

नखाग्रांची आठवण येते  मला 


पोपटी  पानांच्या  टाळ्या  वाजवत

रोपटे नभाकडे झेपावते  जेव्हा 

माझा बाळकृष्ण  उभा  राहतांना

त्यात दिसतो मला तेव्हा 


राहशील  जगात  ठाम कणखर 

दुर्बल  मदतीसाठी जेव्हा

 हा माझा करुणाकर पुत्र  पहा

अभिमानाने गर्जेन तेव्हा  


---संध्या  पाटील 

11.1 2016


ह्या  वर्षातील  पहिली कविता  आलाप तुझ्या  साठी @ Abhishek Patil

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस