वाचन वेड
Shriniwas Deshpande यांच्या या कॉमेन्ट ने काही जाणवले ते.......... "नारदाने
वाल्या कोळ्याला पोँक करून विचारले,
कोणासाठी असली अघोरी कामे करतोस बाबा !
का गुंतून राहतोस आपल्याच कामात ?
आपल्या फ्यामिलीसाठी का ?
मुलाबाळांसाठी का ?
मग जा अन त्यांना लगोलग पुसून ये,
विचारून ये,
या पापात शेअर घेणार का ?
त्याने लगोलग फ्यामिलीच्या वाॅलला टॅग टाकला
तर
घरची सगळीच पाठ फिरवून बसलेली,
बीजीचा बोर्ड लावून
आपआपल्या
व्हाट्सअॅपवर
किंवा
फेसबुकवर गुंगून गेलेली.
आता हे वाचून झाली का पंचाईत ?
या स्क्रीनवरची नजर काढून आजूबाजूला बघणे आले ना !!!?
गुड माॅर्निंग मित्रा " हल्ली माझे असे फेस बुक वर होत असे पण कागदी पुस्तक वाचून जे समाधान लाभते ह्या चेहरा पुस्तकात नाहीच! हसावे की रडावे? कशातही फार गुंतून जाणे वाईटच का? मी पुस्तकात अशीच गुंतून जात असे .अशी समाधी लागायची की आजूबाजूचे भान नसायचे. इतके वेद की रद्दी आवरायला काढली तरी ते जुने पेपर पुन्हा वाचायची , जो कागदाचा तुकडा दिसेल तो वाळवीसारखा खाऊन टाकायची. मोठ्या बहिण भावांची मराठी पुस्तके, संस्कृतची मराठी भाषांतरे तर वाचायाचीच , पण गाईड प्रकार पण आवडायचा ,त्यात इंग्लिश चे गाईड म्हणजे भाषातारातून पुन्हा वाचायला मिळायचे. पण हळू हळू हे कमी होत गेले. कधी वाचनाची सोबत जाऊन संसाराची सोबत लागली हे कळले नाही पण आजही वाटते की एक दिवस तरी असा मिळावा की सकाळपासून फक्त वाचत राहावे, कोणी उठवू नये ,अवती भोवती फक्त आवडीची पुस्तके एखादी वही ,पेन आणि न कळत आपली काळजी घेणारी एक सोबत!
किती मोठी गोष्ट मागतेय मी!!!!!!!
Comments
Post a Comment