गणपती बाप्पा मोरया

 कोणी  दूरदेशी  निघाले  कि  आपण जोरजोराने  हात  हलवून  निरोप  देतो पुढच्या  प्रवासा साठी   शुभेच्छा  देतो आणि एका बाजूला  हळूच  मान वळवून  डोळे  टिपतो.  घर रीकामे ओकेबोके  वाटते.

अगदी  अश्याच  भावना  गणेश  विसर्जनाला  दाटतात. एकीकडे  बाप्पा  ची निरोपाची  तयारी  उत्तर  पूजा ,  शिदोरी, आरतीची  तयारी  ,  निर्माल्य  गोळा करून ते ही आठवणीने  घेणे  आणि  दुसरीकडे  मनात खोल पडत जाणारा खड्डा  आणि इतरांना  जाणवू नये  म्हणून ओढलेला  उत्साहाचा  मुखवटा!  अगदी  आरती  म्हणताना  मध्येच  सूर खालावतो. बाप्पाची मूर्ती  डोळे भरून  पाहून  मनात  साठवून  ठेवली जाते. भरले डोळे  लपवत बाप्पा ला निरोप दिला  जातो. . . . . 

निरोप घेतला  जातो  , पुढच्या वर्षी लवकर या  अश्या  गजराने! !!


गणपती बाप्पा मोरया 

पुढच्या वर्षी लवकर या!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

पाऊस