आज खरोखर कसली गरज आहे?


लोकसत्ता चतुरंग मध्ये नीरजा चा एक लेख आला आहे "डीस्कनेक्ट होण्याच्या काळात"!
या लेखाची लिंक आमच्या शाळेच्या वॉटस अप गृपवर आमचा सोबती आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय कुमावत याने पाठवली होती.



डाॅ. संजय हा लेख वाचून मनात उमटले ते मांडायचा प्रयत्न करते आहे. गेले काही दिवस जे वादळ मनात घोंगावत आहे त्याला मार्ग सापडतो आहे.

आपण शाळासोबती आहोतच पण या लेखात उल्लेख केला त्या प्रमाणे खरोखरच वाॅटस अप वरून कळत नकळत इतिहासातील सोयीचे अर्थ फाॅरवर्ड होत आहेत. राजकारणाचा प्रभाव वैयक्तिक नात्यात ताण निर्माण करतो आहे. सहिष्णुता किंवा सहनशीलता  हा आपला जो स्थायीभाव होता आणि आहे त्यावर काळोखी साचत चालली आहे. घराघरात राजकीय वैचारिक मतभेदांमुळे कटुता वाढते आहे. अगदी भावाभावात किंवा भाऊबहिणींमध्ये सुद्धा ताण वाढतो आहे. एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे पण नेमका त्यावरच घाव घालून मीच कसा /कशी बरोबर हा दृष्टिकोन वाढतो आहे.
आज जागरुकतेची खरोखर गरज आहे आणि त्यासाठी काळजातून येणारे पुस्तकातील किंवा कोणत्याही माध्यमातील शब्दच उपयोगी ठरतील पण ज्यांच्या काळजात माणूसजातीचा कळवळा आहे असे प्रभावी लेखक, कवी, चित्रकार आणि कलाकारही हवेत. कदाचित अश्यांच्या सामुहिक प्रयत्नातून पुन्हा एकदा निकोप समाज तयार होईल!

Comments

  1. Khup chaan!! Very well-stated!
    Technology is making us less human!😔

    ReplyDelete
  2. सुंदर विचार ! Technoligy मुळेच तर विचार लगेच पोहोचलेत. पुस्तका शिवाय ... Whats app ने पुस्तकं वाचण्यासाठी वेळ ठेवलाच नाही ... :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस