Posts

Showing posts from November, 2019

स्मिथ हाऊस, डोंगरी.

स्मिताच्या एका नोटमुळे........... नोस्टाल्जिया म्हणतात तसे झालेय माझे!वडिलांची बदलीची नोकरी ,त्यामुळे मुंबईत बर्याच ठिकाणी राहिलो .खूप वर्षानंतर सँडहर्स्ट रोड स्टेशन ला गेले होते.तेथे स्मिथ हाउस म्हणून एक ब्रिटीश कालीन बांधणीची बिल्डिंग होती .तेथे बालपणीची वर्षे गेली होती .आता सारेच बदलले. ह्या वेगवान मुंबईत तर इतक्या मोठ्या काळानंतर ज्या काही छोट्या मोठ्या खुणा सापडल्या तोच मोठा आनंद असतो.तसेच माझे झाले. भले मोठे घर,बिल्डिंगला दोन जीने ,मागचा चक्राकार लोखंडी जीना खास काम करणारे,कचरा नेणारे यांच्यासाठी आणि मोठा पॅसेज ! बाथटब असलेले बाथरूम ,एक कोळसे भरायला खोली इतकेच आठवते.घरी टोपली भरून केळी आणणारा लाला आठवतो ,नखशिखांत अत्तराने दरवळणारा अत्तरवाला आण्णांना भेटायला घरी आला होता टे आठवतेय आणि त्याने भेट दिलेली फरकॅप आईच्या कपाटात ठेवलेली असे तो अनेक वर्षे टिकलेला सुगंध ही आठवतोय.गच्चीवर खेळायला जाणारे मोठे भाऊ आणि बहिण आणि वरच्या मजल्यावर राहणारे पाटणकर काका आणि त्या प्रेमळ काकू मनात घर करून आहेत.जेंव्हा स्मिथ हाउस पुन्हा पहिले तेंव्हा हे सारे डोळ्यापुढे तरळून गेले