पोलिसातील माणूस
साठवणीतल्या आठवणी बालपणीच्या मी जन्मलो तेंव्हा पहिले महायुध्द संपून दहा वर्षे झाली होती.१९२८ पर्यंत म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेपर्यंत या महायुध्दाचे भीषण परीणाम जगभर पसरू लागले.युध्दात प्रत्यक्ष भाग न घेणार्या भारतासारख्या देशालाही हे परीणाम ब्रिटीशांच्या कृपेने जाणवू लागले.त्यातच १९२९ ची जागतिक मंदी निर्माण झाली. महायुध्दाचा परीणाम म्हणून निर्माण झालेली ही मंदी ब्रिटीशांच्याच कृपेने भारतातही अवतरली. अगदी छोट्या छोट्या खेड्यातही तिचे पडसाद उमटले.आमचे धुळे जिल्ह्यातील कहाटूळ हे गावही त्याला अपवाद नव्हते. त्याकाळी पैसा विशेषत: नगद पैसा ही फ़ार दुर्मिळ गोष्ट होती. वस्तु विनिमयाची [barter system] सर्रास वापरात होती.आमच्या घरची परिस्थिती फ़ारशी वेगळी नव्हती.सर्वांप्रमाणेच रुपया गाडीच्या चाकाइतका मोठा भासत असे. पूर्वजांच्या कृपेने आमचे घर चांगले मोठे ,ऐसपैस, गावाच्या मध्यावर हवेलीसारखे होते. गवात इतर बरीच धाब्याची घरे होती.पण धाब्याची घरे आणि आमची हवेली ह्यांच्या आर्थिक परिस्थितीत फार फ़र...