DREAM THAT IS NOW TRUE
आज जेंव्हा मीनल आणि अभिषेक म्हणजे आलाप चा हा एंगेजमेंटचा कार्यक्रम होतोय तेंव्हा माझे मन संमिश्र भावनांनी दाटून आले आहे..आजपासून आलापची ही हक्काची सखी होईल !! जन्मदात्या आई वडिलांसाठी हा क्षण कृतार्थतेचा असतो आणि परीक्षेचाही असतो. आई वडील कितीही जवळचे असले तरी प्रत्येकाला एक आपले असे माणूस लागतेच आणि ते या दोघांना मिळालेय.आता यापुढे दोघांनाही एकमेकांशिवाय जग दिसणार नाही . दोघानाही आम्हा साऱ्या अनुभवी आणि संसारी लोकांचा अनुभव एका वाक्यात सांगते ...... एक क्षण असतो भाळण्याचा आणि सारे आयुष्य असते नाते सांभाळण्याचे!! अर्थात आलापला केवळ सखी मिळाली असे नाही तर मलाही किंबहुना आम्हा दोघानाही एक मैत्रिणीसारखी सून मिळेल याचा खूप आनंद होतो आहे.आम्हाला हा आनंद मिळवून दिलाय तो आम्हाला पुत्रवत असलेल्या आमच्या दिराने,डॉ.प्रशांत भाई यांनी !या नाते सम्बधाची पहिली सुरुवात केली ती त्यानी आणि त्यांच्या त्या एका फोन चे आज इतके मोठे रूप झाले.जणू एका छोट्या बीजातून एखादा सुं...