एक उलट एक सुलट
शहाद्याच्या 45° च्या काहिलीतून बाहेर पडलो आणि 39°च्या मुंबई कुकरमध्ये शिजून निघालो. पुन्हा 5 दिवस नेपाळ मध्ये धम्माल केली. मग एक दिवस मुंबई नाशिक मुंबईचा ट्राफिक चा घनचक्कर अनुभव घेतला. शिवाय मुंबई कुकर ते मुंबई कुकर व्हाया नाशिकच्या प्रसन्न हवेचा अनुभव घेतला. मग तश्याच उकाड्यात युद्धपातळीवर नेपाळच्या बॅगा रिकाम्या करून कपडे आणि घर आवरून अमेरिकेच्या बॅगा भरल्या. त्यात नेहमी प्रमाणे वजन हा प्रश्न ऐरणीवर होताच. शिवाय सोसायटीचे कामही चालू होतेच. लष्कराच्या भाकर्या भाजणे काही संपत नव्हते. या धबडग्यात आमचे व्याही आणि विहीण बाईच आमचे डावे उजवे हात झाले. अखेर आम्हाला विमान तळावर सोडून तेही त्यांच्या गृही मार्गस्थ झाले. 22 तासात दोन वेळा विमान बदलून एकदाचे अमेरिकेला पोहोचलो. विमान तळावर प्रश्नावली...