Posts

Showing posts from April, 2020

सृजनशक्ती

मोडकळीस येणारी कुटुंब संस्था,वाढते घटस्फ़ोट ही आज जाणत्यांच्या मते चिंतेची बाब आहे. स्रीभ्रूणहत्या आणि एकूणच स्री ला कमी लेखण्याची वृत्ती  दुःख दायक आहे. स्वतःची ताकद नेमकी काय आहे हे स्रीलाच न ओळखता  आल्याने आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   छोट्या छोट्या गृपमधून यावर चर्चा  करून जर स्रियांच्या  विचारात बदल केला तर फरक पडेल. वेळ  लागेल पण फरक पडेलच.  मुलींनी विशेषतः लग्न झालेल्यांनी आपल्या वागण्याने आपण एकूणच स्री जातीला वाईट वाटेल असे वागत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. संयम बाळगून संसार चालवत येणार्या अडचणी  सोडवत पुढे गेले पाहिजे. पटले नाही ,जमत नाही म्हणून लगेच नाते तोडण्याची घाई न करता थोडा विचार वेळ  दिला पाहिजे. स्रीची खरी ताकद जोडण्यात , काही नविन घडवण्यात आहे म्हणून निसर्गाने तिला सृजनशक्ती दिली आहे. शेकडो वर्षांपूर्वी शेतीची सुरवात ही मातृत्वामुळे शिकार न करू शकणार्या स्रियांनी केली.  सृजनशीलतेचे याहून मोठे उदाहरण कोणते? जोडणे ,घडवणे , नवनिर्मिती करणे, टिकवणे हे स्रीचे गुण आहेत जे या मातीतून रुजले आहेत. तीच आपली ताकद...

पक्षी असेही

       मी आता नाशिकला आहे .इथे  एक घार चक्क आमच्या इमारतीच्या प्रवेशद्वारी येवून पडली होती. जखमी होती की आजारी कळेना .बरे जातीवंत शिकारी पक्षी ! जरा जवळ गेले की चोच मारायची तयारी !!         झाडू मारणारी बाई होती ती तिला  पायाने ढकलू पाहत होती ,म्हटले अग असे नको करूस .मुका पक्षी तो , त्याला पाणी ठेवू, कदाचित बरे वाटेल मग जाईल ती! कसे बसे वाकडे तोंड करत  तिने पाणी आणून ठेवले .            मग तीला विचारले , "कोई डाली मिलेगी क्या ? इसे ढक देते है वरना कौवे कुत्ते मार डालेंगे !" येडी मला म्हणते," डाली तो झाड पे मिलेगी |" हसावे की रडावे हेच कळेना . मग म्हटले ,"अरे पगली ,डाली याने  टोकरी ! "          ती जवळ पास  मिळेना म्हणून शोधायला जरा सोसायटीच्या  ऑफिसमध्ये गेले आणि शेवटी शोधाशोध करुन दहा मिनीटात  एक पुठ्ठ्याचा खोका घेवून आले तर घार गायब !           कुठे गेली म्हटले तर गाडी पुसणाऱ्या मुलाने न बोलता झाडाकडे बोट दाखवले आणि झाडूवालीतर...