पक्षी असेही

       मी आता नाशिकला आहे .इथे  एक घार चक्क आमच्या इमारतीच्या प्रवेशद्वारी येवून पडली होती. जखमी होती की आजारी कळेना .बरे जातीवंत शिकारी पक्षी ! जरा जवळ गेले की चोच मारायची तयारी !!
        झाडू मारणारी बाई होती ती तिला  पायाने ढकलू पाहत होती ,म्हटले अग असे नको करूस .मुका पक्षी तो , त्याला पाणी ठेवू, कदाचित बरे वाटेल मग जाईल ती! कसे बसे वाकडे तोंड करत  तिने पाणी आणून ठेवले .
           मग तीला विचारले , "कोई डाली मिलेगी क्या ? इसे ढक देते है वरना कौवे कुत्ते मार डालेंगे !" येडी मला म्हणते," डाली तो झाड पे मिलेगी |" हसावे की रडावे हेच कळेना . मग म्हटले ,"अरे पगली ,डाली याने  टोकरी ! "
         ती जवळ पास  मिळेना म्हणून शोधायला जरा सोसायटीच्या  ऑफिसमध्ये गेले आणि शेवटी शोधाशोध करुन दहा मिनीटात  एक पुठ्ठ्याचा खोका घेवून आले तर घार गायब !
          कुठे गेली म्हटले तर गाडी पुसणाऱ्या मुलाने न बोलता झाडाकडे बोट दाखवले आणि झाडूवालीतर  तिच्या कामाकडे कधीच वळली होती. मी एका हातात खोका घेउन मगाशी उडू न शकणारी घार झाडावर पोचलेली बघून चकित झाले. ...

   चला आज ज्ञानात भर पडली , जीवनेच्छा बलियसी!!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस