माझे आण्णा
माझे वडील म्हणजे आपल्या गुजर समाजातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व !एल.आर.पाटील उर्फ एल .आर. फौजदार या नावाने ते सर्वाना परिचित होते. मुंबईत कोणाचे काही काम अडले असेल तर त्या समाज बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचे कंकण त्यानी हाती बांधले होते. जोपर्यंत ते पोलीस खात्यात काम करत होते तोपर्यंत त्यानी वेळात वेळ काढून आपल्या समाजासाठी कामे केली. शहादा येथील विकास हायस्कूल व आपल्या जन्माग्रमातील कहाटूळ येथील शाळेसाठी त्यांनी मोठा निधी उभारून दिला.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आठ तारखेला त्यांचे दुख:द निधन झाले .त्यांच्या काही आठवणींपैकी ही एक!! रेडीओवर गाणे लागले होते. शब्द झरत होते "पप्पा सांगा कुणाचे ........." मग मला आठवले ते आमचे आण्णा ! असेच दुसरे गाणे "आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला!"!!हेही असेच मनात कालवाकालव करणारे गाणे!! मला एकदम माझ्या वडिलांची, आण्णांची आठवण आली .खूप दिले त्यानी आम्हाला! पोलिस खात्यातील रुक्ष नोकरी करताना त्यांनी निसर्गावर प्रेम करणे सोडले नाही वेळ...