Posts

Showing posts from February, 2020

पियू एक अधुरे स्वप्न

आयुष्य आपल्या गतीने पळत असते, पळवत असते. त्या गतीत गुंगून आपण धावत असतो आणि एकदम दुदैवाची ठेच लागते. गती थांबतेच पण दु:खाचा वेदनेचा एक लोट च्या लोट उसळत जातो. काळाच्या फुंकरीने वेदना कमी होतात .जगणे पाठ सोडत नाही म्हणून पुन्हा आपण गती ही घेतो, पण त्या दुर्दैवी प्रसंगाची आठवण काळजात खोलवर राहते. अश्याच एका मातेला आजचे हे सांगणे अर्पण! खरे तर माताच नाही तर पिता देखील तितकाच विव्हळ, दुःखी! पण या दोघांनी आपल्या कन्येच्या आठवणीत वेगवेगळी समाजोपयोगी कामे सुरू केली. तिच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या कामाला आणि मुलीलाही चिरंजीव केले.  छोटी पियू सगळ्यांचीच लाडकी होती. ती धीटही होती आणि बुद्धीमानही होती. मोठी होऊन तीपण तिच्या वडिलांसारखी एक सहृदय डॉक्टर होईल असेच स्वप्न तीचे आईवडील आणि आजीआजोबा पहात होते. या बुद्धीमान पण भावनाशील मुलीला गंभीर आजारामुळे होणारा आईवडिलांचा विरह जणू सहनच झाला  नाही. अगदी साधे तापाचे निमित्त होऊन पोरगी हातातून निसटून गेली. घरातले सारे धन्वंतरी हतबुद्ध आणि हतबल झाले. मात्र जातांना ती पप्पांना बरे करून जणू तिचे आयुष्य देऊन गेली. वडील बऱ्यापैकी तब्येतीन...

विठ्ठल विठ्ठल

   तो जे देतो तेच मिळवायला सगळे तडफडतात न , मनाचे समाधान. जीवाला शांतता, इच्छापूर्ती ! बरे आहे हो, शिरीमंतानी अजून त्याचे पाय धरायला सुरुवात नाही केली ते ! एकतरी जागा अशी राहू दे जिथे भोळ्या देवाचे भोळे भक्त आपले मस्तक सहज रित्या ठेवू शकतील. प्रत्येक देवस्थानाला जेव्हा पैसे घेऊन दर्शनासाठी श्रीमंतांची वेगळी रांग लावली जाते तेव्हा हे साधेभोळे भक्त पाहून मन केवळ कळवळून जाते. मग तो तिरुपतीचा बालाजी असो, जगन्नाथ पुरी चा कृष्ण असो, शिर्डीचे साईबाबा असो की प्रभादेवी चा सिध्दीविनायक असो. गरीब भक्तांचे कनवाळू म्हणून प्रसिद्ध असलेले हे देव दर्शन पैसैवाल्यांनाच अगोदर देतात.     जेव्हा वारी करत येणारे वारकरी मंदिराचा कळस दिसताच जीवाच्या आकांताने विठुमाऊलीला भेटण्यासाठी दुखर्या पायांची काळजी न करता धावत सुटतात तेव्हा तुझ्या पासून कोणीही त्यांना रोखत नाही. केवळ दर्शनाने भोळ्या भक्तांच्या तनामनाला शांती देतोस म्हणून तर तुला ते माऊली म्हणतात.     बा विठ्ठला  निराश करणाऱ्या अनेक घटनातून कधीतरी जे आशेचे किरण चमकतात नं ते तूच असतोस. माणसातले देवत्व जागे करणारे किरण ...