पियू एक अधुरे स्वप्न

आयुष्य आपल्या गतीने पळत असते, पळवत असते. त्या गतीत गुंगून आपण धावत असतो आणि एकदम दुदैवाची ठेच लागते. गती थांबतेच पण दु:खाचा वेदनेचा एक लोट च्या लोट उसळत जातो. काळाच्या फुंकरीने वेदना कमी होतात .जगणे पाठ सोडत नाही म्हणून पुन्हा आपण गती ही घेतो, पण त्या दुर्दैवी प्रसंगाची आठवण काळजात खोलवर राहते. अश्याच एका मातेला आजचे हे सांगणे अर्पण!
खरे तर माताच नाही तर पिता देखील तितकाच विव्हळ, दुःखी! पण या दोघांनी आपल्या कन्येच्या आठवणीत वेगवेगळी समाजोपयोगी कामे सुरू केली. तिच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या कामाला आणि मुलीलाही चिरंजीव केले.
 छोटी पियू सगळ्यांचीच लाडकी होती. ती धीटही होती आणि बुद्धीमानही होती. मोठी होऊन तीपण तिच्या वडिलांसारखी एक सहृदय डॉक्टर होईल असेच स्वप्न तीचे आईवडील आणि आजीआजोबा पहात होते. या बुद्धीमान पण भावनाशील मुलीला गंभीर आजारामुळे होणारा आईवडिलांचा विरह जणू सहनच झाला  नाही. अगदी साधे तापाचे निमित्त होऊन पोरगी हातातून निसटून गेली. घरातले सारे धन्वंतरी हतबुद्ध आणि हतबल झाले.
मात्र जातांना ती पप्पांना बरे करून जणू तिचे आयुष्य देऊन गेली. वडील बऱ्यापैकी तब्येतीने सावरले. आईपण ह्या कडू दुःखाचे घोट घेऊन बदलत गेली. स्वतःच्या बळावर उभी होत गेली. जिथे असले जीवघेणे दुःख माणसाला कोलमडवून टाकते तिथे हे जगावेगळे दांपत्य नुसते उभेच राहिले नाही तर इतरांना उभे करण्याचे स्वप्न पाहून ते साकार करू लागले. त्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांना त्यांच्या पियू ने मिळवून  दिली. त्यावेळी सोनू म्हणजे आजचा डाॅ. निखिल अगदी बाळवयात होता. ताई त्याने फक्त फोटोमध्ये पाहिली. तो मोठा होत गेला पण ताई तेवढीच छोटी गोड पियू राहीली.
मात्र तिच्यासाठी  आईबाबांनी पाहिलेले डॉक्टर व्हायचे स्वप्न त्याने अपार कष्ट करून पूर्ण केले. खरेतर एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे खूप लाड झाले पण तो कधीही मर्यादेबाहेर  गेला नाही. क्रिकेट चे वेड सोडले तर इतर काही हट्ट केला  नाही. उतला नाही मातला नाही आपले व्रत पुरे करत राहीला.  जणू पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!!
दुःखाचा डोंगर पार करून तिच्या वडिलांनी, भावाने आणि  आईने तिला अजरामर केले आणि पियूचे धूसर स्वप्न सोन. 

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

मराठी अक्षरे ङ आणि ञ

गुगल आणि फेसबुक