विठ्ठल विठ्ठल

   तो जे देतो तेच मिळवायला सगळे तडफडतात
न , मनाचे समाधान. जीवाला शांतता, इच्छापूर्ती ! बरे आहे हो, शिरीमंतानी अजून त्याचे पाय धरायला सुरुवात नाही केली ते ! एकतरी जागा अशी राहू दे जिथे भोळ्या देवाचे भोळे भक्त आपले मस्तक सहज रित्या ठेवू शकतील. प्रत्येक देवस्थानाला जेव्हा पैसे घेऊन दर्शनासाठी श्रीमंतांची वेगळी रांग लावली जाते तेव्हा हे साधेभोळे भक्त पाहून मन केवळ कळवळून जाते. मग तो तिरुपतीचा बालाजी असो, जगन्नाथ पुरी चा कृष्ण असो, शिर्डीचे साईबाबा असो की प्रभादेवी चा सिध्दीविनायक असो. गरीब भक्तांचे कनवाळू म्हणून प्रसिद्ध असलेले हे देव दर्शन पैसैवाल्यांनाच अगोदर देतात.
    जेव्हा वारी करत येणारे वारकरी मंदिराचा कळस दिसताच जीवाच्या आकांताने विठुमाऊलीला भेटण्यासाठी दुखर्या पायांची काळजी न करता धावत सुटतात तेव्हा तुझ्या पासून कोणीही त्यांना रोखत नाही. केवळ दर्शनाने भोळ्या भक्तांच्या तनामनाला शांती देतोस म्हणून तर तुला ते माऊली म्हणतात.
    बा विठ्ठला  निराश करणाऱ्या अनेक घटनातून कधीतरी जे आशेचे किरण चमकतात नं ते तूच असतोस. माणसातले देवत्व जागे करणारे किरण खूप खूप वाढावेत म्हणून आम्ही तुला भजतो रे !
  ज्ञानोबा ते एकनाथांच्या संताच्या मांदियाळीने तुला भजले पण सर्व सामान्य भक्तांना तू आषाढातल्या सस्यश्यामल घनात दिसतोस आणि आपल्या काळपट हिरव्या  शिवारातही दिसतोस. आषाढीला म्हणून तुझा जयघोष करत पिकाची जबाबदारी ते तुझ्यावर सोपवतात आणि आकाशातील चमकत्या तार्यांमध्ये ते तुझा वेध घेत कार्तिकात ते पुन्हा कृतज्ञतेने तुला भजत पंढरीची वाट धरतात. चांदण्यासारखे  चमकते दाणे त्यांना तुझ्या कडे ढकलतात.
  ही कृतज्ञतेची आशेची किरणे पुन्हा धरतीवर पसरू दे!!! 
   
      

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

मराठी अक्षरे ङ आणि ञ

वेदना