बाळ
धरेला चुंबतात कोवळ्या अलवार लाटा दधीच्या जेव्हा बाळा तुझ्या कोमल मुलायम तळव्यांचा आठव येतो तेव्हा दिनमणी पांघरतो भुईवर उबदार लालस चादर उन्हाची जेव्हा बाळा तुझ्या तान्हुल्या तेजाळ नखाग्रांची आठवण येते मला पोपटी पानांच्या टाळ्या वाजवत रोपटे नभाकडे झेपावते जेव्हा माझा बाळकृष्ण उभा राहतांना त्यात दिसतो मला तेव्हा राहशील जगात ठाम कणखर दुर्बल मदतीसाठी जेव्हा हा माझा करुणाकर पुत्र पहा अभिमानाने गर्जेन तेव्हा ---संध्या पाटील 11.1 2016 ह्या वर्षातील पहिली कविता आलाप तुझ्या साठी @ Abhishek Patil