उसका कपडा मेरे कपडेसे सफेद क्युं?

आमच्या  बाजूला एक कंपनीचा फ्लॅट आहे. त्यामुळे तेथे  बदलून  दोन  कुटुंब  राहून गेली.  त्यापैकी  पहिल्या  खूप  आवरत. अगदी  व्यवस्थित घर! एकदम  गृहशोभिका टाईप! मलापण  सुरसुरी  यायची. घर  घर सफाई  सफाई  खेळायची! मला लवकरच कंटाळा  यायला लागला.  आपले वाचन , आवडीनिवडी  बाजूला ठेवून आपण किती  छान  गृहिणी  आहोत आणि  ते फक्त  आपल्या  टापटीप  घरावरूनच कळते ही खुळचट कल्पना  मी डोक्यातून काढून  टाकली. मस्त  आयुष्य  आनंदाने  जगायला  लागले. .

पण तेवढ्यात  त्यांची बदली झाली.  मला    नवे शेजारी  आले. हे  आणखी  वर!  अक्षरशः  चित्रासारखे घर ! सैन्यातून/ हवाई  दलातून ऐच्छिक  निवृत्ती  घेऊन  ते कंपनीत कामाला लागले होते .
त्या शेजारीणबाई खूप स्वच्छता  पाळायच्या.  वागणेही व्यवस्थित!  इकडे घरात  मला ते घर पाहून  पुन्हा  उमाळे  यायला लागले स्वच्छतेचे!!
एक दिवस  संध्याकाळी  मी  त्यांच्या  पतीदेवांना सामान झटकताना पाहिले.  अधूनमधून  कपाट साफसफाई,  बूटपाॅलिश (12 ते 15 जोड) , स्वैपाक करताना  मदत !
मग मात्र मी  शहाणी झाले.  माझे घर वेगळे  ते वेगळे. जगण्यारहाण्याच्या पद्धती वेगळ्या!  कशासाठी  सुखाचा जीवन  दु:खात घालायचा? उसके कपडे मेरे  कपडोंसे सफेद क्यूं?  हा विचारच मुळात  तुलना  शिकवतो.
 आता  चुकून कोणी  बोलले  की बघ किती छान  घर आहे  की मी सांगते तिच्या  नवर्‍या सारखे  काम करा मग बोला.
सध्या  ते घर रीकामे आहे  आणि  मी सुखात !!!😀😜

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस