Posts

मनोगत कविता

 पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील?  नभात झाली कृष्णघनांची गर्दी /कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी /सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द /दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द/  आता पूढे होइल हो अमृताचा वर्षाव /आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव /फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब /गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब!

नारीशक्ती

 मोडकळीस येणारी कुटुंब संस्था,वाढते घटस्फ़ोट ही आज जाणत्यांच्या मते चिंतेची बाब आहे.  स्रीभ्रूणहत्या आणि एकूणच स्री ला कमी लेखण्याची वृत्ती  दुःख दायक आहे. स्वतःची ताकद नेमकी काय आहे हे स्रीलाच न ओळखता  आल्याने आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.    छोट्या छोट्या गृपमधून यावर चर्चा  करून जर स्रियांच्या  विचारात बदल केला तर फरक पडेल. वेळ  लागेल पण फरक पडेलच.  मुलींनी विशेषतः लग्न झालेल्यांनी आपल्या वागण्याने आपण एकूणच स्री जातीला वाईट वाटेल असे वागत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. संयम बाळगून संसार चालवत येणार्या अडचणी  सोडवत पुढे गेले पाहिजे. पटले नाही ,जमत नाही म्हणून लगेच नाते तोडण्याची घाई न करता थोडा विचार वेळ  दिला पाहिजे.  स्रीची खरी ताकद जोडण्यात , काही नविन घडवण्यात आहे म्हणून निसर्गाने तिला सृजनशक्ती दिली आहे.  शेकडो वर्षांपूर्वी शेतीची सुरवात ही मातृत्वामुळे शिकार न करू शकणार्या स्रियांनी केली.  सृजनशीलतेचे याहून मोठे उदाहरण कोणते? जोडणे ,घडवणे , नवनिर्मिती करणे, टिकवणे हे स्रीचे गुण आहेत जे या मातीतून र...

सुख म्हणजे काय असते

 सकाळी  पाच  साडे पाचला उठावे .आवरून पावणेसहाला बाहेर पडावे. देवळालीत बर्याच  बागा आहेत. एखाद्या  बागेत जावे. सहा ते पावणेसात दणकून चालावे. नवरा व्यायाम करायच्या  साधनांकडे वळला की आपण पण थोडेफार कंबर , गुडघे वगैरेचा थोडा जादाचा व्यायाम  करावा. नंतर  एखादा बाक पकडावा.   मान नीट  बाकाच्या पाठीवर टेकेल अशी पोझ  घ्यावी आणि आकाशाच्या दिशेने  पहावे. मस्त  फिकट  निळ्या  रंगाच्या  पार्श्वभूमीवर हिरव्यागार  पानांनी लगडलेल्या  झाडाच्या  फांद्या , वरून घाईघाईने  उडत जाणारे पक्षी,  झाडांमधून ऐकू येणारी  पक्ष्यांची किलबिल, मधूनच ऐकू येणारी कोकीळेची सुरेल तान यामुळे  मन प्रसन्न  होत जाते. बदामाची काळपट बदाम ल्यालेली नखरेल फांदी , आकाशाचे छोटे छोटे तुकडे दाखवणारी वडाची भरगच्च जाळी, मोहोर न येता केवळ  वसंताची नवी  पालवी फुटलेला आंबा लक्ष वेधून घेत  असतात. मॅडचॅपसारखी जास्वंदी, तगर भरभरून  फुलतात. हे का फुलले म्हणून मोगर्याच्या कळ्या  डोकावतात आणि फुलून स...

अमेरिकन कापूस गिरणी

 आज अमेरीकेत बर्टन (Burton) ह्या गावात काॅटन जिन मिल म्युझियम पाहिले. अमेरिकेत जुन्या विंटेज गोष्टींची खास काळजी घेतली जाते हे ऐकून होते ते अधोरेखित झाले. १८ व्या शतकातील कापूस पिंजणी व सरकी वेगळी करणे , कापसाच्या गाठी १७५ कीलो वजनाच्या बनवणे आणि घोडागाडीवर लादून ते पुढे पाठवणे हे एका व्हीडीओतून दाखवले. महत्त्वाचे हे की मूळ जिनिंग मिल जी डीझेल सदृश्य जळणावर चालते ती अजूनही चालू अवस्थेत आहे आणि वर्षातून दोन वेळा चालवून तीला सांभाळले जाते.  म्युझियम सांभाळणार्या दोघीजणी उत्साहाने सर्व दाखवत होत्याच पण एकूण सजावट व त्यासाठी वापरलेले सामान यांत थीम कापूस होती.  कापसाच्या छोट्या छोट्या गाठी, कापसाच्या कृत्रिम बोंडे , कापसाच्या बोंडाचे डिझाईन असलेले दागिने, हाताने बनवलेले छोटे मोठे कपडे इत्यादी कल्पक गोष्टी होत्या. कापूस वापरून बनवलेल्या  मिलचा इतिहास दाखवणार्या फ्रेम्स, वाॅलहॅंगिंग्ज , गालिचे छान वातावरण निर्मिती करत होते. इतकेच काय तर बाहेर कुंड्यातूनही कापसाच्या झाडे लावली होती.

पानगळ आणि सौंदर्य

 पानगळीआधीचे सौंदर्य!  निसर्गाने भरभरून सृष्टी सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारे उधळले आहे. पानगळतीत कसले आलेय सौंदर्य असे वाटू नये म्हणून ही रंगपंचमी निसर्ग खेळत असतो .जणू रंगपंचमी खेळत आनंदाने पानांचे निरोप घेतले जातात. मेपलला खूप महत्त्व आहे इथे! फार देखणी पाने असतात त्याची ! पॅनकेकबरोबर खाण्यासाठी मधासारखे भासणारे मेपल सिरप वापरले जाते. हा लाॅस एंजेलिसला असताना काढलेला फोटो! आता हळूहळू पानगळ सुरू होईल. त्याआधी झाडांचे रंग बदलत जातात.सुंदर लाल केशरी पिवळे रंग होतात पानांचे! खूप वाचले होते ह्या फाॅल्स कलर्स बद्दल! बर्याच वर्षांपूर्वी इथे रहाणार्या एका   नातेवाईकांना विनंती केली होती की मला फाॅल्स मधली मेपल ची लाल केशरी पाने पाठवा फक्त !! पण तोडले की रंग बदलतो म्हणून त्यांना पाठवता आले नाही. गेल्या वर्षी पावसामुळे हुकले होते ते मनोरम दर्शन! आता यावर्षी  याची देही याची डोळा बघेन हे अनुपम सौंदर्य!!

जबलपूर

 जबलपूर चा भेडाघाट! 1974ला वसुंधरा पेंडसे नाईक यांचा एक लेख रविवारच्या लोकसत्तामध्ये  वाचला होता. ' एका कोजागिरीच्या रात्री'! त्यात कोजागिरीला काय काय करावे यात लेखिकेने लिहिले होते की कोजागिरीला भेडाघाटात नावेमधून संगमरवरी पहाडांचे चांदण्यात निथळणारे नितळ सौंदर्य न्याहाळावे. इतर ही बर्‍याच  गोष्टी होत्या.  पण हा भेडाघाट मनात रुजला होता.  काल पाहिला हा दिवसा!! कधीतरी पौर्णिमा पण साधून...

गुगल आणि फेसबुक

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=10214368138068029&id=155493759 आभासी जगावर स्वामित्व गाजवणार्या दोन कंपन्या म्हणजे गुगल आणि फेस बुक!! आज दोन्ही कंपन्यांचा परिसर पाहिला. देखण्या वास्तू , सुंदर रंगसंगती, वातावरणात जाणवणारी सकारात्मक उर्जा , काळजी पूर्वक जोपासलेली बाग आणि मन मोहून टाकणारा निसर्ग!!  सगळीकडे भरून उरलेली फाॅल सीझनची जादू!! मन गार्डन गार्डन हो गया जी!! देता किती घेशील दो करांनी अशी परिस्थिती झाली.  गेले सात आठ दिवस हे सृष्टी सौंदर्य अनुभवते आहे. थॅन्क्स Abhishek Patil Minal Patil Ninad Patil Manali Pednekar!! Thanks Poranno!! This is the best gift of Thanks Giving!!