मनोगत कविता

 पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील?

 नभात झाली कृष्णघनांची गर्दी /कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी /सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द /दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द/  आता पूढे होइल हो अमृताचा वर्षाव /आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव /फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब /गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस