विनीसाठी
सासरी निघाली पोर डोळा आले पाणी
वधुवेशात सजली छोटी माझी चिमणी
आण घातली गळा पडून रडू नका कुणी
पण निघता तू सजलेली कंठ येई दाटूनी
चार पावले चालून पुढे वळून पाहशी थोडे
बंधू भगिनी जिवलगांचे तुला मिठ्या वेढेम
का घातली पित्यास आण अशी कठोर वेडे
पाळणे जे अवघड ते कसे मनास पडे कोडे
सजल नेत्री ओठी हासू दुःख मनी लपवती
हट्ट पुरवत विनी दिला मनाजोगता पती
Comments
Post a Comment