शहाणी सई

 भेट


केला करोनाने कहर कसे आपल्यात अंतर

घरातच दुराव्याने हृदयाला पडली घरं


येता दारात आम्ही  चेहरा कोवळा उजळला

किती गोष्टी दाखवाया जीव उत्सुक जाहला 


पण प्रवासाचा ताण, असेल का जंतुरोपण?

अलगद तुला टाळत आम्ही केले प्रेम दुरून


तुला मायपित्यांनी तसे कवटाळून समजावले

आले दुरून आजीआजोबा थोडे दूर रहा बरे 


जरी मानलेस बोल त्यांचे मला मनी जाणवते

तुझ्या डोळ्यांत बोलात आंस स्पर्शाची खुणावते


तरी बोललीस स्पष्ट, तुला मिठी मारू का ग

स्वतःतच आकसून म्हणतेस साॅरीसाॅरी मग


इतुकी ही शहाणिव  वय वर्षे फक्त तीन

जीव आमचा घुसमटे आणि आम्ही आहो दीन


संपतील सात दिन विना काही तापाने 

घेऊ गळाभेट नातीची आशा पल्लवित मनाने


दोन वर्षांचा वियोग ,सोपे होते सहन करणे 

किती कठीण कठीण पाहुनिया न स्पर्शणे!!

संध्या पाटील

13 सप्टेंबर 2020

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस