आईचे मन

 मुलं मोठी होतात, पाखरांसारखी पंखात बळ येईपर्यंत घराच्या आजूबाजूला उडत धडपडत राहतात.  आई लक्ष ठेवून असते. हळूहळू पंखात ताकद आली की मुले जगाच्या अवकाशात आपली जागा शोधायला झेप घेतात. नवीन आयुष्यात मुले स्थिरावली असे जाणवले की आई रिकामी होते. असोशीने सांभाळलेला संसार पूर्ण झालाय असे जाणवू लागले की स्री मनाने आणि नंतर शरीराने जगण्यापासून दूर होते. 

     कालच माझा लेक परत त्याच्या नोकरीवर रुजू होण्यासाठी गेला. मन रिते झाले आहे.

       अश्रू ढाळणे हा मनाचा कमकुवतपणा मानते मी! आयुष्यात लढा, आयुष्याला रसरसून भेटा असे शिकवणारी मी आज का हळवी होतेय. 

        स्वयंपाक करताना करंजी दिसली की त्याची आठवण, काल आवरलेल्या चादरी, पांघरूणं म्हणजे पुन्हा तुझीच आठवण, स्प्रे, साबण, दिवाळीचे दिवे आणि काय काय! आम्ही दोघांनी तुम्ही तिघे येणार म्हणून 

कितीतरी ठरवलेले प्रोग्राम आणि एकवीस दिवसाच्या सुट्टी ला फुटलेले पाय! सगळ्या प्रेमळ सुहृदांनी वेळेत पाडलेला वाटा आणि  आता पुढच्या सुट्टीची वाट पाहणारे उरलेले आमच्या स्वप्नांचे तुकडे! 

भेटू पुन्हा तेव्हा बोलू असे मनात तेवत राहणारे आशेचे कंदील!!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस