पानगळ आणि सौंदर्य

 पानगळीआधीचे सौंदर्य!


 निसर्गाने भरभरून सृष्टी सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारे उधळले आहे. पानगळतीत कसले आलेय सौंदर्य असे वाटू नये म्हणून ही रंगपंचमी निसर्ग खेळत असतो .जणू रंगपंचमी खेळत आनंदाने पानांचे निरोप घेतले जातात.

मेपलला खूप महत्त्व आहे इथे! फार देखणी पाने असतात त्याची ! पॅनकेकबरोबर खाण्यासाठी मधासारखे भासणारे मेपल सिरप वापरले जाते. हा लाॅस एंजेलिसला असताना काढलेला फोटो! आता हळूहळू पानगळ सुरू होईल. त्याआधी झाडांचे रंग बदलत जातात.सुंदर लाल केशरी पिवळे रंग होतात पानांचे! खूप वाचले होते ह्या फाॅल्स कलर्स बद्दल! बर्याच वर्षांपूर्वी इथे रहाणार्या एका   नातेवाईकांना विनंती केली होती की मला फाॅल्स मधली मेपल ची लाल केशरी पाने पाठवा फक्त !! पण तोडले की रंग बदलतो म्हणून त्यांना पाठवता आले नाही. गेल्या वर्षी पावसामुळे हुकले होते ते मनोरम दर्शन! आता यावर्षी  याची देही याची डोळा बघेन हे अनुपम सौंदर्य!!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

मराठी अक्षरे ङ आणि ञ

वेदना