अमेरिकन कापूस गिरणी

 आज अमेरीकेत बर्टन (Burton) ह्या गावात काॅटन जिन मिल म्युझियम पाहिले. अमेरिकेत जुन्या विंटेज गोष्टींची खास काळजी घेतली जाते हे ऐकून होते ते अधोरेखित झाले. १८ व्या शतकातील कापूस पिंजणी व सरकी वेगळी करणे , कापसाच्या गाठी १७५ कीलो वजनाच्या बनवणे आणि घोडागाडीवर लादून ते पुढे पाठवणे हे एका व्हीडीओतून दाखवले.

महत्त्वाचे हे की मूळ जिनिंग मिल जी डीझेल सदृश्य जळणावर चालते ती अजूनही चालू अवस्थेत आहे आणि वर्षातून दोन वेळा चालवून तीला सांभाळले जाते. 

म्युझियम सांभाळणार्या दोघीजणी उत्साहाने सर्व दाखवत होत्याच पण एकूण सजावट व त्यासाठी वापरलेले सामान यांत थीम कापूस होती. 

कापसाच्या छोट्या छोट्या गाठी, कापसाच्या कृत्रिम बोंडे , कापसाच्या बोंडाचे डिझाईन असलेले दागिने, हाताने बनवलेले छोटे मोठे कपडे इत्यादी कल्पक गोष्टी होत्या.


कापूस वापरून बनवलेल्या  मिलचा इतिहास दाखवणार्या फ्रेम्स, वाॅलहॅंगिंग्ज , गालिचे छान वातावरण निर्मिती करत होते. इतकेच काय तर बाहेर कुंड्यातूनही कापसाच्या झाडे लावली होती.

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

मराठी अक्षरे ङ आणि ञ

वेदना