नारीशक्ती
मोडकळीस येणारी कुटुंब संस्था,वाढते घटस्फ़ोट ही आज जाणत्यांच्या मते चिंतेची बाब आहे.
स्रीभ्रूणहत्या आणि एकूणच स्री ला कमी लेखण्याची वृत्ती दुःख दायक आहे. स्वतःची ताकद नेमकी काय आहे हे स्रीलाच न ओळखता आल्याने आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
छोट्या छोट्या गृपमधून यावर चर्चा करून जर स्रियांच्या विचारात बदल केला तर फरक पडेल. वेळ लागेल पण फरक पडेलच. मुलींनी विशेषतः लग्न झालेल्यांनी आपल्या वागण्याने आपण एकूणच स्री जातीला वाईट वाटेल असे वागत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. संयम बाळगून संसार चालवत येणार्या अडचणी सोडवत पुढे गेले पाहिजे. पटले नाही ,जमत नाही म्हणून लगेच नाते तोडण्याची घाई न करता थोडा विचार वेळ दिला पाहिजे.
स्रीची खरी ताकद जोडण्यात , काही नविन घडवण्यात आहे म्हणून निसर्गाने तिला सृजनशक्ती दिली आहे.
शेकडो वर्षांपूर्वी शेतीची सुरवात ही मातृत्वामुळे शिकार न करू शकणार्या स्रियांनी केली. सृजनशीलतेचे याहून मोठे उदाहरण कोणते?
जोडणे ,घडवणे , नवनिर्मिती करणे, टिकवणे हे स्रीचे गुण आहेत जे या मातीतून रुजले आहेत. तीच आपली ताकद आहे
या नवरात्रीच्या निमित्ताने हे समजून घेऊ या इतर सगळ्यांना समजाऊन सांगूया. केवळ नऊ दिवस उपवास करून , गरबे खेळून किंवा देवीची पूजा करून नवरात्र होत नाही त्यासाठी नव्याने स्वतः ला ओळखून सिध्द करण्याची गरज आहे.
चला तर नवरात्र जागवू या.
.
Comments
Post a Comment