Posts

Showing posts from 2019

स्मिथ हाऊस, डोंगरी.

स्मिताच्या एका नोटमुळे........... नोस्टाल्जिया म्हणतात तसे झालेय माझे!वडिलांची बदलीची नोकरी ,त्यामुळे मुंबईत बर्याच ठिकाणी राहिलो .खूप वर्षानंतर सँडहर्स्ट रोड स्टेशन ला गेले होते.तेथे स्मिथ हाउस म्हणून एक ब्रिटीश कालीन बांधणीची बिल्डिंग होती .तेथे बालपणीची वर्षे गेली होती .आता सारेच बदलले. ह्या वेगवान मुंबईत तर इतक्या मोठ्या काळानंतर ज्या काही छोट्या मोठ्या खुणा सापडल्या तोच मोठा आनंद असतो.तसेच माझे झाले. भले मोठे घर,बिल्डिंगला दोन जीने ,मागचा चक्राकार लोखंडी जीना खास काम करणारे,कचरा नेणारे यांच्यासाठी आणि मोठा पॅसेज ! बाथटब असलेले बाथरूम ,एक कोळसे भरायला खोली इतकेच आठवते.घरी टोपली भरून केळी आणणारा लाला आठवतो ,नखशिखांत अत्तराने दरवळणारा अत्तरवाला आण्णांना भेटायला घरी आला होता टे आठवतेय आणि त्याने भेट दिलेली फरकॅप आईच्या कपाटात ठेवलेली असे तो अनेक वर्षे टिकलेला सुगंध ही आठवतोय.गच्चीवर खेळायला जाणारे मोठे भाऊ आणि बहिण आणि वरच्या मजल्यावर राहणारे पाटणकर काका आणि त्या प्रेमळ काकू मनात घर करून आहेत.जेंव्हा स्मिथ हाउस पुन्हा पहिले तेंव्हा हे सारे डोळ्यापुढे तरळून गेले

मित्रवर्य

काल खूप खूप दिवसानंतर माझा प्रिय मित्र भेटला. तब्येतीच्या तक्रारीमुळे डॉक्टर कडे काही तपासण्या करणे अनिवार्य होते.रिक्षाने जाताना अचानक त्याचे असणे जाणवले. त्याचा तो खर्जातला धीरगंभीर आवाज,सगळ्या वातावरणात जाणवत होता. हवेच्या  थंडगार लहरी जाणवायल्या लागल्या . मनाला जाणवले हा काय इथेच आहेना तो! डाव्या हाताला त्याचे darshan झाले.समुद्राचे!! पावसाळ्यातला तो समुद्राचा खास राखाडी रंग, नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याने दिसणारी जुहूच्या समुद्र किनाऱ्या वरची पांढरीशुभ्र वाळू ,भरून आलेले आभाळ सारे मला  एक शांतपणा देवून गेले.समुद्राच्या त्या निव्वळ ओझरत्या भेटीने सुद्धा किती बरे वाटले.  उद्या मित्रदिना च्या निमित्ताने खूप शुभेच्छा येतील ,आठवणी जागतील,पण त्याचे लाटांचे  आवाज आणि माझे निशब्द बोल ह्यातून उमललेली मैत्री!  तिला कोणत्या शुभेच्छा देवू?

माझे आण्णा

माझे वडील म्हणजे आपल्या गुजर समाजातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व !एल.आर.पाटील उर्फ एल .आर. फौजदार या नावाने ते सर्वाना परिचित होते. मुंबईत कोणाचे काही काम अडले असेल तर त्या समाज बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचे कंकण त्यानी हाती बांधले होते. जोपर्यंत ते पोलीस खात्यात काम करत होते तोपर्यंत त्यानी वेळात वेळ  काढून आपल्या समाजासाठी कामे केली. शहादा येथील विकास हायस्कूल व आपल्या जन्माग्रमातील कहाटूळ येथील शाळेसाठी त्यांनी मोठा निधी उभारून दिला.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आठ तारखेला त्यांचे दुख:द निधन झाले .त्यांच्या काही आठवणींपैकी ही एक!!                        रेडीओवर गाणे लागले होते. शब्द झरत होते "पप्पा सांगा कुणाचे ........."  मग मला आठवले ते आमचे आण्णा ! असेच दुसरे गाणे "आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला!"!!हेही असेच मनात कालवाकालव करणारे गाणे!! मला एकदम माझ्या वडिलांची, आण्णांची आठवण आली .खूप दिले त्यानी आम्हाला! पोलिस खात्यातील रुक्ष नोकरी करताना त्यांनी निसर्गावर प्रेम करणे सोडले नाही वेळ...

आला आला पावसाळा!

कडाक्याच्या उन्हाच्या झळा सोसल्याशिवाय पावसाचे महत्त्व जाणवत नाही हे खरे!  ह्या वर्षी भारतातला उन्हाळा अनुभवला नाही पण अमेरिकन टेक्सास चा कडक उन्हाळा अनुभवला .तपमान १००° फॅरनहाईट ला पोचले होते. पण वाॅटरपार्क ,कारंजी, पोहण्याचा तलाव यामुळे ऊन्हाळा सुसह्य  होता. पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील? मला एकदा भर पावसात महाबळेश्वरला फिरताना झाडांनीच हे गुज   नभात झाली कृष्णघनांची गर्दी कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द  आता पुढे होइल हो अमृताचा वर्षाव आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब! निसर्गाचा असा जल्लोष सुरू झाला की धरती थरारते. गवताची नाजूक पाती तिच्यावर आपली मायेची झूल पांघरतात. त्या हिरवाईने माखलेली धरती पाहून पाऊस आणखीच चेकाळतो जणू! त्याचा हल्लागुल्ला सुरू होतो.सैराटासारखा कोसळत तो सारे नद्यानाले इतके भरतो की तेसुद्धा आपली मर्यादा सोडून उफाणून वाहू लागतात. सागरही ग...

एक उलट एक सुलट

शहाद्याच्या 45° च्या काहिलीतून बाहेर पडलो  आणि  39°च्या  मुंबई  कुकरमध्ये शिजून  निघालो.  पुन्हा 5 दिवस नेपाळ मध्ये  धम्माल  केली.  मग  एक दिवस  मुंबई  नाशिक  मुंबईचा  ट्राफिक  चा घनचक्कर अनुभव घेतला.  शिवाय मुंबई  कुकर ते मुंबई  कुकर  व्हाया नाशिकच्या  प्रसन्न हवेचा  अनुभव घेतला. मग तश्याच  उकाड्यात  युद्धपातळीवर नेपाळच्या  बॅगा  रिकाम्या  करून  कपडे आणि घर आवरून  अमेरिकेच्या बॅगा  भरल्या.  त्यात  नेहमी प्रमाणे  वजन हा प्रश्न  ऐरणीवर होताच. शिवाय  सोसायटीचे कामही चालू होतेच. लष्कराच्या भाकर्‍या  भाजणे काही  संपत  नव्हते. या धबडग्यात आमचे व्याही आणि  विहीण  बाईच आमचे डावे उजवे हात  झाले. अखेर  आम्हाला  विमान तळावर सोडून  तेही त्यांच्या  गृही मार्गस्थ  झाले. 22 तासात  दोन  वेळा  विमान बदलून  एकदाचे अमेरिकेला पोहोचलो. विमान  तळावर प्रश्नावली...

आज खरोखर कसली गरज आहे?

लोकसत्ता चतुरंग मध्ये नीरजा चा एक लेख आला आहे "डीस्कनेक्ट होण्याच्या काळात"! या लेखाची लिंक आमच्या शाळेच्या वॉटस अप गृपवर आमचा सोबती आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय कुमावत याने पाठवली होती. डाॅ. संजय हा लेख वाचून मनात उमटले ते मांडायचा प्रयत्न करते आहे. गेले काही दिवस जे वादळ मनात घोंगावत आहे त्याला मार्ग सापडतो आहे. आपण शाळासोबती आहोतच पण या लेखात उल्लेख केला त्या प्रमाणे खरोखरच वाॅटस अप वरून कळत नकळत इतिहासातील सोयीचे अर्थ फाॅरवर्ड होत आहेत. राजकारणाचा प्रभाव वैयक्तिक नात्यात ताण निर्माण करतो आहे. सहिष्णुता किंवा सहनशीलता  हा आपला जो स्थायीभाव होता आणि आहे त्यावर काळोखी साचत चालली आहे. घराघरात राजकीय वैचारिक मतभेदांमुळे कटुता वाढते आहे. अगदी भावाभावात किंवा भाऊबहिणींमध्ये सुद्धा ताण वाढतो आहे. एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे पण नेमका त्यावरच घाव घालून मीच कसा /कशी बरोबर हा दृष्टिकोन वाढतो आहे. आज जागरुकतेची खरोखर गरज आहे आणि त्यासाठी काळजातून येणारे पुस्तकातील किंवा कोणत्याही माध्यमातील शब्दच उपयोगी ठरतील पण ज्यांच्या काळजात माणूसजातीचा कळवळा आहे असे प...

Healthy tips

40 Tips for a Better Life: 1. Take a 10-30 minute walk every day. And while you walk, smile. It is the ultimate anti-depressant. 2. Sit in silence for at least 10 minutes each day. 3. Go to bed earlier and get more sleep. 4. When you wake up in the morning complete the following: 'Today, my primary purpose is to __________.' 5. Live with the 3 E's -- Energy, Enthusiasm, and Empathy. 6. Play more games and read more books than you did last year. 7. Make time to practice meditation, and prayer. They provide us with daily fuel for our busy lives. 8. Spend time with people over the age of 70 and under the age of 6. 9. Dream more while you are awake. 10. Eat more foods that grow on trees and plants and eat less food that is manufactured or packaged in factories. 11. Drink green tea and plenty of water. 12. Try to make at least three people smile each day. 13. Clear clutter from your house, your car, your desk and let new energy flow into your li...
काय असते बरे आपल्या मनात ?  काही सांगावे वाटते पुन्हा थांबावे वाटते. ......... एकेक विचार पिसून पुन्हा बोलावे वाटते>>> जुने हरवलेले आठवावे वाटते पण आहे का महत्वाचे म्हणून परत मागे ठेवावे वाटते.!!!!!!!!!!!!!!!!!!!  कोणी दुखावेल म्हणून गप्पच  राहावे वाटते-------  शेवटी सारे उशीला चिब भिजवत सांगावे वाटते. सारे तिलाच कळले सारेच तिला कळते....    sandhya patil

आला वसंत आला

सकाळी  पाच  साडे पाचला उठावे .आवरून पावणेसहाला बाहेर पडावे. देवळालीत बर्याच  बागा आहेत. एखाद्या  बागेत जावे. सहा ते पावणेसात दणकून चालावे. नवरा व्यायाम करायच्या  साधनांकडे वळला की आपण पण थोडेफार कंबर , गुडघे वगैरेचा थोडा जादाचा व्यायाम  करावा. नंतर  एखादा बाक पकडावा.   मान नीट  बाकाच्या पाठीवर टेकेल अशी पोझ  घ्यावी आणि आकाशाच्या दिशेने  पहावे. मस्त  फिकट  निळ्या  रंगाच्या  पार्श्वभूमीवर हिरव्यागार  पानांनी लगडलेल्या  झाडाच्या  फांद्या , वरून घाईघाईने  उडत जाणारे पक्षी,  झाडांमधून ऐकू येणारी  पक्ष्यांची किलबिल, मधूनच ऐकू येणारी कोकीळेची सुरेल तान यामुळे  मन प्रसन्न  होत जाते. बदामाची काळपट बदाम ल्यालेली नखरेल फांदी , आकाशाचे छोटे छोटे तुकडे दाखवणारी वडाची भरगच्च जाळी, मोहोर न येता केवळ  वसंताची नवी  पालवी फुटलेला आंबा लक्ष वेधून घेत  असतात. मॅडचॅपसारखी जास्वंदी, तगर भरभरून  फुलतात. हे का फुलले म्हणून मोगर्याच्या कळ्या  डोकावतात आणि फुलून सगळ्या...

निसर्ग गाणे

जरा उन्हं वगैरे विसरून सकाळी सकाळी झाडा कडे पहिले की तजेलदार हिरवी पाने दिसतात .काही आंब्याच्या झाडांवर कोवळ्या हिरव्यागार कैऱ्या दिसतात .काही वेडे आळशी आंबे कैऱ्या अंगावर वागवण्या ऐवजी पुन्हा तांबूस पालवीने डवरून जाहीर करतात आता आम्हाला वेगळे वागायचेय.        पिंपळ तर उत्साहाने नुसता सळसळत असतो , कित्ती वेगवेगळे पक्षी त्याच्या फांद्यांवर बागडत असतात. त्याला कुऱ्हाडी ची किंवा दगड खाण्याची भीती नाहीच. कारण बेदरकारपणे सगळ्या झाडांवर कुर्हाड चालवणारा माणूस पिंपळावर अंध श्रद्धे पोटी तरी कुर्हाड चालवत नाही. कसा चौ अंगानी पसरत चाललाय तो!     आसुपालव आपली नवी पाने कावळ्यांची  घरटी लपवायला वापरतोय आणि जरा डोकावून पाहायला सुरवात केली की कावळे कर्कश्श कावकाव करून आपल्या जातभाई ना गोळा करतात आणि जरा जरी आपल्याकडून धोक्याची शंका आली तर सतत लक्ष ठेवून टोच मारून आपले बाहेर डोकावणे हे बंद करू शकतात.        मोगरीच्या झाडालाही नवी पालवी येवून झाड कळ्यानी  भरून गेले आहे. जरा पाण्याचा ताण पडताच झाडे मलूल होत आहेत. गार वार्यात सकाळी संध्याक...

ययाती बद्दल!!

काही दिवसांपूर्वी 'ययाती ' हे श्री .वि.स. खांडेकर यांचे पुस्तक पुन्हा वाचले. शाळकरी वयात वाचले होतेच पण तेंव्हा फक्त मजा म्हणून किंवा अरे इतके गाजलेले आहे तर वाचू या म्हणून वाचलेले होते. यावेळी अगदी प्रस्तावनेसहित वाचले. ते दोन शब्द १९६१ सालातले आणि पुस्तक हाता वेगळे  केले ते ह्या पुस्तकाचा जन्म का आणि कसं झाला ह्याबद्दलची पार्श्वभूमी वाचून ! हा ययाती सर्वांच्याच मनात असतो त्याचा उपयोग करून  जाहिरात बाजी करून शारीरिक सौंदर्याचा बोलबाला केला जातो ते जपण्यासाठी करोडो रुपयाच्या बाजारपेठेला जन्म दिला जातो . उपभोगाची ज्वाला भडकतच राहावी संयमाचे आवरण त्यावर राहू नये यासाठीच जणू ह्या पासष्टाव्या कलेचा उपयोग केला जातो पण मनातल्या ययातीला  रोखायचे असते ते आपणच....  त्या पार्श्वभूमी मध्ये लिहिलेला बारावा भाग माझ्या मनाला जास्त भिडला. त्याकाळात त्यांना जाणवलेले चित्रपटाचे दुष्परिणाम , सामाजिक बेफिकिरी ,काम आणि प्रेमात होत असलेली गल्लत सारे त्याना अस्वस्थ करीत होते ... पण आजही ते आम्हा ला तसेच अस्वस्थ आणि हतबुद्ध करीत आहे ना......

DREAM THAT IS NOW TRUE

आज जेंव्हा मीनल आणि अभिषेक  म्हणजे आलाप चा हा  एंगेजमेंटचा  कार्यक्रम होतोय तेंव्हा माझे मन संमिश्र भावनांनी दाटून आले आहे..आजपासून आलापची  ही हक्काची सखी होईल !! जन्मदात्या आई वडिलांसाठी हा क्षण कृतार्थतेचा असतो आणि परीक्षेचाही असतो. आई वडील कितीही जवळचे असले तरी प्रत्येकाला एक आपले असे माणूस लागतेच आणि ते या दोघांना मिळालेय.आता यापुढे दोघांनाही एकमेकांशिवाय जग दिसणार नाही .           दोघानाही आम्हा साऱ्या  अनुभवी आणि संसारी लोकांचा अनुभव एका वाक्यात सांगते ......  एक क्षण असतो भाळण्याचा आणि सारे आयुष्य असते नाते सांभाळण्याचे!!         अर्थात  आलापला केवळ सखी मिळाली असे नाही तर मलाही किंबहुना आम्हा दोघानाही एक मैत्रिणीसारखी सून मिळेल याचा खूप आनंद होतो आहे.आम्हाला हा आनंद मिळवून दिलाय तो आम्हाला पुत्रवत असलेल्या आमच्या दिराने,डॉ.प्रशांत भाई यांनी !या नाते सम्बधाची पहिली सुरुवात केली ती त्यानी आणि त्यांच्या त्या एका फोन चे आज इतके मोठे रूप झाले.जणू एका छोट्या बीजातून एखादा सुं...

MYTHS OF EXPIRY DATES.

एक्सपायरी डेट चे गौडबंगाल FAMILY OF DOCTORS IN  ENGLAND  HAVE BEEN HAMMERING THIS POINT THAT MEDICINES DON’T EXPIRE. AN 80 YEARS OLD WELL KNOWN DOCTOR, IN MUMBAI, WITH VAST EXPERIENCE INSIST ON SAME POINT.   DO MEDICATIONS REALLY EXPIRE ??????u Some reassuring and very useful info !!!!!!! By Richard Altschuler Does the expiration date on a bottle of a medication mean anything? If a bottle of Tylenol, for example, says something like "Do not use after June 1998," and it is August 2002, should you take the Tylenol? Should you discard it? Can you get hurt if you take it? Will it simply have lost its potency and do you no good? In other words, are drug manufacturers being honest with us when they put an expiration date on their medications, or is the practice of dating just another drug industry scam, to get us to buy new medications when the old ones that purportedly have "expired" are still perfectly good? These are the pressing questions I investigated ...

उसका कपडा मेरे कपडेसे सफेद क्युं?

आमच्या  बाजूला एक कंपनीचा फ्लॅट आहे. त्यामुळे तेथे  बदलून  दोन  कुटुंब  राहून गेली.  त्यापैकी  पहिल्या  खूप  आवरत. अगदी  व्यवस्थित घर! एकदम  गृहशोभिका टाईप! मलापण  सुरसुरी  यायची. घर  घर सफाई  सफाई  खेळायची! मला लवकरच कंटाळा  यायला लागला.  आपले वाचन , आवडीनिवडी  बाजूला ठेवून आपण किती  छान  गृहिणी  आहोत आणि  ते फक्त  आपल्या  टापटीप  घरावरूनच कळते ही खुळचट कल्पना  मी डोक्यातून काढून  टाकली. मस्त  आयुष्य  आनंदाने  जगायला  लागले. . पण तेवढ्यात  त्यांची बदली झाली.  मला    नवे शेजारी  आले. हे  आणखी  वर!  अक्षरशः  चित्रासारखे घर ! सैन्यातून/ हवाई  दलातून ऐच्छिक  निवृत्ती  घेऊन  ते कंपनीत कामाला लागले होते . त्या शेजारीणबाई खूप स्वच्छता  पाळायच्या.  वागणेही व्यवस्थित!  इकडे घरात  मला ते घर पाहून  पुन्हा  उमाळे  यायला लागले स्वच्छतेचे!!...

पुनरागमनाय

तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा लिहायला सुरवात करतेय .वेळ तर लागतोच  आहे. हे एक वाक्य लिहायला पन्धरा मिनिटे लागली. परत एकदा ते बरहाचे माहीती देणारे मेल शोधावे लागेल.. मोबाईल मुळॆ कितीतरी विसरले आहे. साधे सोप्पे करुन देणारे मोबाईल आपल्याला पान्गळे करतेय हे फ़ार तीव्र्तेने जाणवले. कीती अक्शरे विसरले आहे ! आज इतकेच पूरे!