Mother dare? म्हणजे आई होण्यासाठी गोळा केलेले धैर्य की मुलांना मोठे करताना वेळोवेळी निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगातून बाहेर पडण्याचे धैर्य? आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तीन तीन मुलांना मोठे करताना काही गमावले आणि काही कमावले. पण हा लेखाजोखा मांडत रहाण्यात मजा नही. आम्ही मुले वाढवली ती पारंपारिक पद्धतीने! कधी रागावून तर कधी चुचकारून! पण आज एक पोस्ट आठवते आहे डाॅ. स्वाती दंडे यांची! जणू आमच्या पिढीतील आयांचेच प्रातिनिधिक मनोगत! चारच कारणे मला माझी मुलं पून्हा लहान व्हायला हवी आहेत , चारंच कारणांसाठी . १. त्यांना शक्य तितकं कवटाळण्यासाठी , २. त्यांना वाढवतांना मी जीथे जीथे चुकले ,ते सर्व सुधारण्यासाठी , ३. माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते त्यांना सतत जाणवून देण्यासाठी आणि ४. त्यांच्यासोबत जगतांना , त्यांच्याशिवायही आपलं जग आहे ह्याची जाणीव ठेवून , तेंव्हाच , त्यांच्याशिवाय जगण्याची थोडी थोडी सवय करण्यासाठी ! आता त्यांच्या फिजिकली दूर असण्याचा , चूकांच्या आठवणींनी वाटणाऱ्या खंतेचा ,प्रेम सढळपणे व्यक्त न केल्या...