Posts

गांधींबद्दल

 जरूर वाचा निश्चित आनंद मिळेल महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते. काय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर जोतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी जोतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, काही म्हणा, ‘तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.’ मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’ तो हसला व म्हणाला, ‘गांधीजी.’ मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वषेर् झाली, तरी! ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणताना ऐकतो की, कधी नव्हेत...

गणपती बाप्पा मोरया

 कोणी  दूरदेशी  निघाले  कि  आपण जोरजोराने  हात  हलवून  निरोप  देतो पुढच्या  प्रवासा साठी   शुभेच्छा  देतो आणि एका बाजूला  हळूच  मान वळवून  डोळे  टिपतो.  घर रीकामे ओकेबोके  वाटते. अगदी  अश्याच  भावना  गणेश  विसर्जनाला  दाटतात. एकीकडे  बाप्पा  ची निरोपाची  तयारी  उत्तर  पूजा ,  शिदोरी, आरतीची  तयारी  ,  निर्माल्य  गोळा करून ते ही आठवणीने  घेणे  आणि  दुसरीकडे  मनात खोल पडत जाणारा खड्डा  आणि इतरांना  जाणवू नये  म्हणून ओढलेला  उत्साहाचा  मुखवटा!  अगदी  आरती  म्हणताना  मध्येच  सूर खालावतो. बाप्पाची मूर्ती  डोळे भरून  पाहून  मनात  साठवून  ठेवली जाते. भरले डोळे  लपवत बाप्पा ला निरोप दिला  जातो. . . . .  निरोप घेतला  जातो  , पुढच्या वर्षी लवकर या  अश्या  गजराने! !! गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्...

वाचन वेड

 Shriniwas Deshpande   यांच्या या  कॉमेन्ट ने   काही जाणवले ते..........                                                                "नारदाने  वाल्या कोळ्याला पोँक करून विचारले, कोणासाठी असली अघोरी कामे करतोस बाबा ! का गुंतून राहतोस आपल्याच कामात ?  आपल्या फ्यामिलीसाठी का ? मुलाबाळांसाठी का ? मग जा अन त्यांना लगोलग पुसून ये,  विचारून ये,  या पापात शेअर घेणार का ?  त्याने लगोलग फ्यामिलीच्या वाॅलला टॅग टाकला  तर घरची सगळीच पाठ फिरवून बसलेली, बीजीचा बोर्ड लावून आपआपल्या  व्हाट्सअॅपवर  किंवा  फेसबुकवर गुंगून गेलेली.  आता हे वाचून झाली का पंचाईत ?  या स्क्रीनवरची नजर काढून आजूबाजूला बघणे आले ना !!!? गुड माॅर्निंग मित्रा "                                    ...

पाऊस

 पाउस पडून जुना झाला पण आज संधी मिळाली पावसात भिजायची आणि जाणवले कि हा जुना कधी होतच नाही. भिजले की  मनाला आनंदाचे नवे कोपल फुटतात. तप्त मनावर शीतल शिडकावा होतो.पुन्हा नव्याने उन्ह सोसायची तयारी होते आणि त्यातूनही नवे काही घडवावेसे वाटते.

वेदना

 मैतरणीचे स्वप्न गोजिरे मनापासून  जोजवले ,  कसे  कुठे  अन् काय  बिनसले  ,गेले  गेले  निसटले. अस्वस्थ  मनाचे मुकेच रूदन कुणास कैसे   ऐकवले. अरण्यरूदन केवळ  ठरेल हे मनोमनी तरी  जाणवले.  विनाशब्द हे आसू ओघळती हृदय अंतरी दुखावले.  क्षमा  प्रीतीचा बोध आठवून मनास पुन्हा  कवळीले नव्या  दमाने उत्साहाने नवनवे गाणे  हे गुंफत गेले. दुःखास दडवून हृदयांतरी मी मुखवटे सुखाचे पेहेरले. संध्या  पाटील

मराठी अक्षरे ङ आणि ञ

 DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.) #ङ_ञ_व_त्र मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की? मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  : क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग) च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग) ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यां...

ड्राइविंग

 काल पहिल्यांदा  मुंबई ते नाशिक गाडी चालवली. Feeling happy. खूप मस्त  वाटले. घाटात ट्राफिक जाम  होता. नेमका  काल एक ट्रक  पलटी झाला  होता.  पण लवकरच पोलिसांनी  मार्ग  मोकळा  केला.  नंतर  आम्ही  आणि  आमची इनोव्हा ! तीन तासात  मुंबई  ते नाशिक. ..... Love you INNOVA..

सीतेचे दुःख (कविता)

 कधी  आपल्या  तेजाने   होरपळून  टाकणारी उन्हे तर कधी  आपल्या  वर्षावात  गुदमरून  टाकणारा  पाऊस  माये धरती  तुला  तरी कसे कळावे  या वर्षावाने सुखाचे निश्वास   मृदगंधातून कसे उसळावे आपली चिलीपिली , झाडे माडे  दुखावलेली पाहून मनीचे  आक्रंदन  कसे  रोखावे . हा पिढ्या नि पिढ्यांचा  भोगच ग माये तुझ्याकडून  तुझ्या  लेकीकडे  सीतेकडे अन् तिच्याकडून  गहू गहू सगळ्या  स्त्रियांकडे..... संध्या पाटील

देवभूमि

 किती वर्ष झाली ,  एकदा तरी  देवभूमीला केवळा  भेट देवू या  असे मनात   घोळत होते. आला एकदाचा तो योग ! एकट्याने  जाण्यापेक्षा  गृपने जाऊ ,  जास्त मजा येईल म्हणून दहा जण निघालोय.  जास्त  दगदग  नको म्हणून  जाणे येणे विमानाने! त्यात सहा जण आयुष्यात  पहिल्यांदाच  विमान प्रवास  करणारे होते.     काल सकाळी  आमच्याकडे  सगळे  जमले. सुचनेबरहुकूम त्यांनी  बॅगा  वजन आटोक्यात  ठेवून  भरल्या  होत्या. मग पर्समध्ये  चाकूच काय पण नेलकटर सुद्धा  नको  असे सांगून  मी त्यांना पॅकींगमध्ये बदल करायला  लावले. आमच्याकडे  प्रवासी कंपनीने  त्यांच्याही केबीन बॅगा  एकूण दहा पोचवल्या होत्या.  त्या दिल्या  आणि  काही   सामान त्यात  हलवले. हुश्श करत सगळे तैय्यार झाले बाबा!!     मस्त पैकी  घरची साजूक तूपातली पुरणपोळी,  आमरस त्यावर सढळ हस्ते  तुपाची धार , कटाची झणझणीत आमटी,  मिरचीभजी , पनीरपक...

बाळ

 धरेला  चुंबतात कोवळ्या  अलवार  लाटा दधीच्या  जेव्हा  बाळा तुझ्या  कोमल  मुलायम  तळव्यांचा आठव येतो तेव्हा   दिनमणी पांघरतो भुईवर उबदार  लालस चादर उन्हाची जेव्हा  बाळा  तुझ्या  तान्हुल्या तेजाळ नखाग्रांची आठवण येते  मला  पोपटी  पानांच्या  टाळ्या  वाजवत रोपटे नभाकडे झेपावते  जेव्हा  माझा बाळकृष्ण  उभा  राहतांना त्यात दिसतो मला तेव्हा  राहशील  जगात  ठाम कणखर  दुर्बल  मदतीसाठी जेव्हा  हा माझा करुणाकर पुत्र  पहा अभिमानाने गर्जेन तेव्हा   ---संध्या  पाटील  11.1 2016 ह्या  वर्षातील  पहिली कविता  आलाप तुझ्या  साठी @ Abhishek Patil

टिटू

 दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सक्काळी टीटू चे सर आले .आम्ही सारे मुलांचे नवे ट्युशन चे सर घरी येतात तेंव्हा जसे उत्सुक असतो तसेच होतो.आता हे काय सांगतील? आपला सोन्या अभ्यास करेल का? त्याला ह्या सरांचे शिकवणे आवडेल का? मनात असंख्य प्रश्न होते. तर सर म्हणून ज्यांनी प्रवेश केला त्यानी टीटू चे  कौतुक केले. आमची छाती अभिमानाने फुगली ."आहेच आमचा सोन्या हुश्श्यार!!" त्यानी त्याला जवळ बोलावले तसे आमचे महाराज शेपूट फलकवत जवळ गेले.तसं टीटू जात्याच प्रेमळ ! नुसता दांडगा देह आणि प्रेमळ मन !         सरांनी आमच्या अभिमानाला पहिली टाचणी लावली. "किती महिन्यांचा हा?" म्हटले "तीन महिने!"सर म्हणाले ,"अरेरे !हा जरा जास्तच मोठा झालाय शिकवण्यासाठी!" उशिरा शाळेत मुलाला घालणाऱ्या पालकाच्या काळजीने आणि धाकधुकीने ,शरमेने मी विचारले ,"मग आता?" ते म्हणाले,"बघू ,शिकवू जमेल तेव्हडे!" "  पण सर साधारण कधीपासून शिकवायला सुरुवात करायला हवी होती?",मला माझी उत्सुकता गप्पा बसू देईना . अहो ताई ,पिल्लू एक महिन्याचे झाले की शिकवायला सुरुवात करावी लागते. नंत...

नववर्षांच्या शुभेच्छा

नए साल  की शुभकामनाये देते हुए  हिंदी के जानेमाने कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना की कविता...   ----------------------------------------------------------------------------- नए साल की शुभकामनाएँ! खेतों की मेड़ों पर धूल भरे पाँव को कुहरे में लिपटे उस छोटे से गाँव को नए साल की शुभकामनाएं!  जाँते के गीतों को बैलों की चाल को करघे को कोल्हू को मछुओं के जाल को नए साल की शुभकामनाएँ! इस पकती रोटी को बच्चों के शोर को चौंके की गुनगुन को चूल्हे की भोर को नए साल की शुभकामनाएँ! वीराने जंगल को तारों को रात को ठंडी दो बंदूकों में घर की बात को नए साल की शुभकामनाएँ! इस चलती आँधी में हर बिखरे बाल को सिगरेट की लाशों पर फूलों से ख़याल को नए साल की शुभकामनाएँ! कोट के गुलाब और जूड़े के फूल को हर नन्ही याद को हर छोटी भूल को नए साल की शुभकामनाएँ! उनको जिनने चुन-चुनकर ग्रीटिंग कार्ड लिखे उनको जो अपने गमले में चुपचाप दिखे नए साल की शुभकामनाएँ! _---------------------------------------------------

मनोगत कविता

 पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील?  नभात झाली कृष्णघनांची गर्दी /कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी /सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द /दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द/  आता पूढे होइल हो अमृताचा वर्षाव /आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव /फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब /गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब!

नारीशक्ती

 मोडकळीस येणारी कुटुंब संस्था,वाढते घटस्फ़ोट ही आज जाणत्यांच्या मते चिंतेची बाब आहे.  स्रीभ्रूणहत्या आणि एकूणच स्री ला कमी लेखण्याची वृत्ती  दुःख दायक आहे. स्वतःची ताकद नेमकी काय आहे हे स्रीलाच न ओळखता  आल्याने आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.    छोट्या छोट्या गृपमधून यावर चर्चा  करून जर स्रियांच्या  विचारात बदल केला तर फरक पडेल. वेळ  लागेल पण फरक पडेलच.  मुलींनी विशेषतः लग्न झालेल्यांनी आपल्या वागण्याने आपण एकूणच स्री जातीला वाईट वाटेल असे वागत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. संयम बाळगून संसार चालवत येणार्या अडचणी  सोडवत पुढे गेले पाहिजे. पटले नाही ,जमत नाही म्हणून लगेच नाते तोडण्याची घाई न करता थोडा विचार वेळ  दिला पाहिजे.  स्रीची खरी ताकद जोडण्यात , काही नविन घडवण्यात आहे म्हणून निसर्गाने तिला सृजनशक्ती दिली आहे.  शेकडो वर्षांपूर्वी शेतीची सुरवात ही मातृत्वामुळे शिकार न करू शकणार्या स्रियांनी केली.  सृजनशीलतेचे याहून मोठे उदाहरण कोणते? जोडणे ,घडवणे , नवनिर्मिती करणे, टिकवणे हे स्रीचे गुण आहेत जे या मातीतून र...

सुख म्हणजे काय असते

 सकाळी  पाच  साडे पाचला उठावे .आवरून पावणेसहाला बाहेर पडावे. देवळालीत बर्याच  बागा आहेत. एखाद्या  बागेत जावे. सहा ते पावणेसात दणकून चालावे. नवरा व्यायाम करायच्या  साधनांकडे वळला की आपण पण थोडेफार कंबर , गुडघे वगैरेचा थोडा जादाचा व्यायाम  करावा. नंतर  एखादा बाक पकडावा.   मान नीट  बाकाच्या पाठीवर टेकेल अशी पोझ  घ्यावी आणि आकाशाच्या दिशेने  पहावे. मस्त  फिकट  निळ्या  रंगाच्या  पार्श्वभूमीवर हिरव्यागार  पानांनी लगडलेल्या  झाडाच्या  फांद्या , वरून घाईघाईने  उडत जाणारे पक्षी,  झाडांमधून ऐकू येणारी  पक्ष्यांची किलबिल, मधूनच ऐकू येणारी कोकीळेची सुरेल तान यामुळे  मन प्रसन्न  होत जाते. बदामाची काळपट बदाम ल्यालेली नखरेल फांदी , आकाशाचे छोटे छोटे तुकडे दाखवणारी वडाची भरगच्च जाळी, मोहोर न येता केवळ  वसंताची नवी  पालवी फुटलेला आंबा लक्ष वेधून घेत  असतात. मॅडचॅपसारखी जास्वंदी, तगर भरभरून  फुलतात. हे का फुलले म्हणून मोगर्याच्या कळ्या  डोकावतात आणि फुलून स...

अमेरिकन कापूस गिरणी

 आज अमेरीकेत बर्टन (Burton) ह्या गावात काॅटन जिन मिल म्युझियम पाहिले. अमेरिकेत जुन्या विंटेज गोष्टींची खास काळजी घेतली जाते हे ऐकून होते ते अधोरेखित झाले. १८ व्या शतकातील कापूस पिंजणी व सरकी वेगळी करणे , कापसाच्या गाठी १७५ कीलो वजनाच्या बनवणे आणि घोडागाडीवर लादून ते पुढे पाठवणे हे एका व्हीडीओतून दाखवले. महत्त्वाचे हे की मूळ जिनिंग मिल जी डीझेल सदृश्य जळणावर चालते ती अजूनही चालू अवस्थेत आहे आणि वर्षातून दोन वेळा चालवून तीला सांभाळले जाते.  म्युझियम सांभाळणार्या दोघीजणी उत्साहाने सर्व दाखवत होत्याच पण एकूण सजावट व त्यासाठी वापरलेले सामान यांत थीम कापूस होती.  कापसाच्या छोट्या छोट्या गाठी, कापसाच्या कृत्रिम बोंडे , कापसाच्या बोंडाचे डिझाईन असलेले दागिने, हाताने बनवलेले छोटे मोठे कपडे इत्यादी कल्पक गोष्टी होत्या. कापूस वापरून बनवलेल्या  मिलचा इतिहास दाखवणार्या फ्रेम्स, वाॅलहॅंगिंग्ज , गालिचे छान वातावरण निर्मिती करत होते. इतकेच काय तर बाहेर कुंड्यातूनही कापसाच्या झाडे लावली होती.

पानगळ आणि सौंदर्य

 पानगळीआधीचे सौंदर्य!  निसर्गाने भरभरून सृष्टी सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारे उधळले आहे. पानगळतीत कसले आलेय सौंदर्य असे वाटू नये म्हणून ही रंगपंचमी निसर्ग खेळत असतो .जणू रंगपंचमी खेळत आनंदाने पानांचे निरोप घेतले जातात. मेपलला खूप महत्त्व आहे इथे! फार देखणी पाने असतात त्याची ! पॅनकेकबरोबर खाण्यासाठी मधासारखे भासणारे मेपल सिरप वापरले जाते. हा लाॅस एंजेलिसला असताना काढलेला फोटो! आता हळूहळू पानगळ सुरू होईल. त्याआधी झाडांचे रंग बदलत जातात.सुंदर लाल केशरी पिवळे रंग होतात पानांचे! खूप वाचले होते ह्या फाॅल्स कलर्स बद्दल! बर्याच वर्षांपूर्वी इथे रहाणार्या एका   नातेवाईकांना विनंती केली होती की मला फाॅल्स मधली मेपल ची लाल केशरी पाने पाठवा फक्त !! पण तोडले की रंग बदलतो म्हणून त्यांना पाठवता आले नाही. गेल्या वर्षी पावसामुळे हुकले होते ते मनोरम दर्शन! आता यावर्षी  याची देही याची डोळा बघेन हे अनुपम सौंदर्य!!

जबलपूर

 जबलपूर चा भेडाघाट! 1974ला वसुंधरा पेंडसे नाईक यांचा एक लेख रविवारच्या लोकसत्तामध्ये  वाचला होता. ' एका कोजागिरीच्या रात्री'! त्यात कोजागिरीला काय काय करावे यात लेखिकेने लिहिले होते की कोजागिरीला भेडाघाटात नावेमधून संगमरवरी पहाडांचे चांदण्यात निथळणारे नितळ सौंदर्य न्याहाळावे. इतर ही बर्‍याच  गोष्टी होत्या.  पण हा भेडाघाट मनात रुजला होता.  काल पाहिला हा दिवसा!! कधीतरी पौर्णिमा पण साधून...

गुगल आणि फेसबुक

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=10214368138068029&id=155493759 आभासी जगावर स्वामित्व गाजवणार्या दोन कंपन्या म्हणजे गुगल आणि फेस बुक!! आज दोन्ही कंपन्यांचा परिसर पाहिला. देखण्या वास्तू , सुंदर रंगसंगती, वातावरणात जाणवणारी सकारात्मक उर्जा , काळजी पूर्वक जोपासलेली बाग आणि मन मोहून टाकणारा निसर्ग!!  सगळीकडे भरून उरलेली फाॅल सीझनची जादू!! मन गार्डन गार्डन हो गया जी!! देता किती घेशील दो करांनी अशी परिस्थिती झाली.  गेले सात आठ दिवस हे सृष्टी सौंदर्य अनुभवते आहे. थॅन्क्स Abhishek Patil Minal Patil Ninad Patil Manali Pednekar!! Thanks Poranno!! This is the best gift of Thanks Giving!!

विनीसाठी

 सासरी निघाली पोर डोळा आले  पाणी वधुवेशात सजली छोटी  माझी चिमणी  आण घातली गळा पडून रडू नका  कुणी पण निघता तू सजलेली कंठ येई दाटूनी  चार पावले चालून पुढे वळून पाहशी थोडे  बंधू भगिनी  जिवलगांचे तुला मिठ्या  वेढेम का घातली  पित्यास आण अशी कठोर वेडे पाळणे जे अवघड ते कसे मनास पडे कोडे सजल नेत्री ओठी हासू दुःख मनी लपवती हट्ट पुरवत विनी दिला मनाजोगता पती